Left Side Shirt Pocket: शर्टचा खिसा कधीच उजव्या बाजूने नसतो; असं का?

Shirt Pocket left Side: अशी एखादी घटना ज्यामुळे खिसा फक्त डाव्या बाजूने बनवायची पद्धत निर्माण झाली
shirt design facts
shirt design factsDainik Gomantak
Published on
Updated on

clothing design: तुम्ही अनेकवेळा पाहिलं असेल की आपल्या शर्टचा खिसा हा डाव्या बाजूने असतो. आता आलेल्या नवीन फॅशननुसार दोन्ही बाजूनी खिशांची पद्धत आलीये खरी मात्र अजूनही लोकं अधिक प्रमाणात डाव्या बाजूने खिसा असलेल्या शर्टचा वापर करतात. कधी विचार केला आहे असं का असेल? यामध्ये काही वैज्ञानिक कारण असेल का? किंवा अशी एखादी घटना ज्यामुळे खिसा फक्त डाव्या बाजूने बनवायची पद्धत निर्माण झाली. नेमकं काय असले यामागचं कारण काय आहे, चला जाणून घेऊया..

फार पूर्वी शर्टला खिसाच नव्हता. त्यानंतर हळूहळू माणसाला गोष्टी हाताळणं सोपं व्हावं म्हणून खिसा तयार झाला. कधी पेन किंवा कधी एखादी चॉकोलेट ठेवण्यासाठी खिशाचा वापर सुरु झाला. मात्र हे का सुरु झालं हे जाणून घेतलं का? हा आपल्या दैनंदिन आयुष्यातला प्रश्न आहे खरा मात्र आपण त्याचा कधी विचार देखील करत नाही.

शर्टचा खिसा डाव्या बाजूने का याला काही खास कारण नाही. आपण बहुतेक कामांसाठी उजव्या हाताचा वापर करतो आणि म्हणून उजव्या हाताने गोष्टी डाव्या बाजूने ठेवायला मदत होते.

shirt design facts
T-Shirt मधील 'T' चा जाणून घ्या अर्थ

एखादी महत्वाची गोष्ट चटकन काढायची किंवा ठेवायची असेल, हाताजवळ पाहिजे असेल तर खिशात हात टाकून पटकन मिळवता येते. पूर्वी महिलांच्या शर्टमध्ये खिशाची फॅशन नव्हती, मात्र काळ जस-जसा बदलायला सुरुवात झालीये आता महिलांना देखील शर्टच्या डाव्या बाजूने खिसा दिला जातोय.

कदाचित यानंतर शर्टच्या उजव्या बाजूला देखील एक खिसा करावा असं वाटलं असेल आणि सध्या ही गोष्ट फॅशनचा भाग बनली आहे. आता शर्टच्या दोन्ही बाजूला खिसा असल्याने वस्तू ठेवणं आणि काढणं सोपं झालंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com