Men's Fashion Tips: टी-शर्ट घालताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, तरच मिळेल हँडसम लुक

Handsome Look in t-shirt: तुम्हीही टी-शर्ट घालत असाल तर पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा. कारण यामुळे तुम्हाला परफेक्ट लूक मिळू शकतो.
Men's Fashion Tips
Men's Fashion TipsDainik Gomantak
Published on
Updated on

mens fashion tips how look handsome in t shirt read full story

मुली ज्याप्रमाणे त्यांच्या कपड्यांची आणि दागिन्यांची खास काळजी घेतात, त्याचप्रमाणे आजकाल मुले देखील त्यांच्या स्टायलची खूप काळजी घेतात.

त्यांना ऑफिसपासून आऊटिंगपर्यंत स्टायलिश कपडे घालायला आवडतात. यासाठी अनेक वेळा मुले बॉलीवूड सेलिब्रिटींकडून टिप्स घेतात, परंतु अनेक वेळा असे घडते की टिप्स घेऊनही मुले कपडे नीट कॅरी करू शकत नाहीत.

जर तुम्हाला टी-शर्ट घालायची आवड असेल तर काही सिंपल टिप्स फॉलो करून हँडसम दिसू शकता.

  • परफेक्ट फिटिंग

जर तुम्ही पोलो टी-शर्ट घातले असेल, तर त्याचे फिटिंग योग्य असले पाहिजे. जर टी-शर्ट खूप सैल असेल तर तो विचित्र दिसेल, तर खूप घट्ट टी-शर्ट तुमचा लूक खराब करू शकतो. हे टी-शर्ट घातल्याने शरीराचा आकारही विचित्र दिसतो.

  • पॉकेट असलेले टी-शर्ट टाळा

अनेक लोक टी-शर्टच्या पुढील एका बाजूला पॉकेट असते. हे दिसायला चांगले असले तरी ते घातल्यावर तुमचा लूक खराब दिसू शकतो. तुम्ही जो टीशर्ट घालणार आहात त्यात पॉकीट नसेल हे तपासून घ्यावे.

  • कॉलर नीट लावा

एक काळ असा होता की बहुतेक मुले टीशर्टची कॉलर उभी ठेवत होत, पण आता काळ बदलला आहे. आजकाल, टी-शर्टची कॉलर योग्य पद्धतीने सेट केली जाते.

  • बटणे बंद करणे

टी-शर्टमध्ये परफेक्ट दिसण्यासाठी फक्त वरचे बटण उघडे ठेवा. जर तुम्ही सर्व बटणे उघडी ठेवली तर ते अगदी विचित्र दिसते. जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर बटणांची खास काळजी घ्यावी.

  • टी-शर्ट टक करणे

जर तुमचे पोट मोठे असेल तर, टी-शर्ट कधीही टक म्हणजेच आत घालू नका. कारण यामुळे पोट अधिक विचित्र दिसेल. तुम्ही फिट असाल तर तुमच्या आवडीचा टी-शर्ट टक करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com