Sodium Salt: सोडियमयुक्त मीठ कमी खा, जास्त खाल्ल्यास होऊ शकतात घातक परिणाम; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

WHO Sodium Intake Recommendation: जागतिक आरोग्य संघटनेकडून वेळोवेळी आरोग्याच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शक तत्वे जारी केली जातात.
सोडियमयुक्त मीठ कमी खा, जास्त खाल्ल्यास होऊ शकतात घातक परिणाम; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
SaltDainik Gomantak
Published on
Updated on

WHO Sodium Intake Recommendation: जागतिक आरोग्य संघटनेकडून वेळोवेळी आरोग्याच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शक तत्वे जारी केली जातात. याचदरम्यान, आता जागतिक आरोग्य संघटनेकडून एक आवाहन करण्यात आले आहे. सोडियमयुक्त मीठ कमी खाण्याचे आवाहन संघटनेकडून करण्यात आले.

सामान्य मीठाऐवजी पोटॅशियमयुक्त कमी-सोडियम मीठ अन्नात वापरावे. मात्र हे आवाहन केवळ प्रौढ आणि निरोगी व्यक्तींसाठीच करण्यात आले आहे. गर्भवती महिला, मुले आणि मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या लोकांना सामान्य मीठ खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांनी कमी सोडियम असलेले मीठ खाऊ नये, असे संघटनेने म्हटले. याआधीच सोडियमचे सेवन दररोज 2 ग्रॅम कमी करण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आली आहे.

मीठाचे सेवन संतुलित प्रमाणात करावे

दरम्यान, मीठ ना जास्त प्रमाणात खावे ना कमी. त्याचे संतुलित प्रमाणात सेवन केले पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) एका व्यक्तीने दररोज 5 ग्रॅम मीठाचे सेवन केले पाहिजे, परंतु भारतीय लोक दररोज सरासरी 10 ग्रॅम मीठाचे सेवन करतात. जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवतात.

सोडियमयुक्त मीठ कमी खा, जास्त खाल्ल्यास होऊ शकतात घातक परिणाम; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
खराब अन्न खाल्याने दरवर्षी किती लोक मरतात? ज्यामुळे होतात घातक अजार, जाणून घ्या WHO ची आकडेवारी

तज्ज्ञांनी WHO च्या सूचनेचे कौतुक केले

जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आलेल्या आवाहानाचे तज्ञांनी कौतुक केले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, WHO ची मार्गदर्शक तत्वे भारतीय लोकांसाठी अधिक उपयुक्त आहेत. कारण भारतीय लोकांना मीठ वेगळे खाण्याची सवय आहे. भारतीयांमध्ये टेबलावर मिठाचा (Salt) डबा घेऊन बसण्याची जुनी प्रवृत्ती आहे. लोक जेवणापूर्वी खूप मीठ वापरतात. अशा परिस्थितीत, आरोग्य संघटनेचा हे आवाहन भारतीयांसाठी महत्त्वाचे आहे. भारतीय लोकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे.

जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी घातक

जास्त प्रमाणात मीठ खाणे एकूणच आरोग्यासाठी विष खाण्यासारखे आहे. जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो. याशिवाय हृदयविकाराचा झटका आणि हृदयरोगाचा धोका (Heart Disease) वाढू शकतो. तसेच, मूत्रपिंड, यकृत आणि ब्लडवरही परिणाम होतो. यामुळे अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. अशा परिस्थितीत भारतीय लोकांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे.

सोडियमयुक्त मीठ कमी खा, जास्त खाल्ल्यास होऊ शकतात घातक परिणाम; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
Disease X: कोरोनापेक्षा 20 पटीने घातक असणाऱ्या डिसीजनं वाढवली चिंता, WHO घेणार बैठक

जास्त मीठ खाण्याचे हानिकारक परिणाम

रक्तदाब वाढणे

हृदयरोग

हाडे कमकुवत होणे

पोटाच्या समस्या

मूत्रपिंडाचे आजार

वजन वाढणे

डिहायड्रेशन

त्वचेच्या समस्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com