Disease X: कोरोनापेक्षा 20 पटीने घातक असणाऱ्या डिसीजनं वाढवली चिंता, WHO घेणार बैठक

Disease X: डिसीज एक्स नावाचा आजार गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. याबाबत मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली जात आहे.
WHO Director Ghebreyesus
WHO Director GhebreyesusDainik Gomantak
Published on
Updated on

Disease X: डिसीज एक्स नावाचा आजार गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. याबाबत मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली जात आहे. तज्ञांनी हा आजार कोरोनापेक्षा 20 पटीने जास्त घातक असल्याचे सांगितले आहे. आता WHO देखील या आजाराला गांभीर्याने घेत आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे या आठवड्याच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीच्या अजेंड्यामध्ये एक्स रोगाचा देखील समावेश करण्यात आला आहे. डब्ल्यूएचओचे संचालक गेब्रेयसस इतर आरोग्य अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करतील. या आजाराच्या कारणांबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. असे असूनही तो भविष्यासाठी अत्यंत धोकादायक मानला जात आहे

पॅनेलमध्ये चर्चा होणार

दरम्यान, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 2017 मध्येच या आजाराला मॉनिटरिंग लिस्टमध्ये ठेवले होते. SARS आणि Ebola सोबतच X वरही चाचण्या घेतल्या जात होत्या. WHO ने याला सर्वोच्च प्राधान्य दिले होते. एवढचं नाही तर याला डिसीज एक्स असेही नाव देण्यात आले. दुसरीकडे, डब्ल्यूएचओ प्रमुख दावोसमध्ये या आजारावर ज्यांच्याशी भेटणार आहेत त्यात ब्राझीलचे आरोग्य मंत्री निकिया त्रिनिदाद लिमा, मिशेल डेमारे, फार्मास्युटिकल कंपनी एस्ट्राझेनेका बोर्डाचे अध्यक्ष, रॉयल फिलिप्सचे सीईओ रॉय जेकब्स आणि भारताच्या अपोलो हॉस्पिटल्सच्या कार्यकारी उपाध्यक्ष प्रीता रेड्डी यांचा समावेश आहे. डॉ. गेब्रेयसस बुधवारी 'प्रिपेयरिंग फॉर डिसीज एक्स' या पॅनेलचे नेतृत्व करतील.

WHO Director Ghebreyesus
जगासमोर नवं संकट; Disease X ला रोखण्यासाठी ब्रिटीश वैज्ञानिकांची धावपळ

बैठकीचा अर्थ काय

दरम्यान, जगाला अधिक प्राणघातक महामारीपासून वाचवायचे असेल तर तयार राहण्याची गरज असल्याचे डब्ल्यूईएफने म्हटले आहे. त्यासाठी आगामी आव्हाने लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सुधारावी लागणार आहे. त्यासाठी नवीन आवश्यक प्रयत्नांवरही चर्चा केली जाईल. आता वॅक्सिन, औषधे आणि चाचण्या तसेच प्लॅटफॉर्म तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी या बैठका घेतल्या जात आहेत. खरे तर, वन्यजीवांमध्ये विषाणूंचा मोठा साठा आहे. हे मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरु शकते. कारण हे विषाणू प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरण्याची भीती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com