तुम्हाला दूध पिण्याची योग्य वेळ माहितीये का?

लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाने रोज एक ग्लास दूध प्यायलाच हवे. परंतु आयुर्वेदानुसार काही शारीरिक समस्या असल्यास दूध पिणे योग्य मानले जात नाही.
milk
milkDainik Gomantak
Published on
Updated on

दूध पिणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, डी, ई इत्यादी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे हाडे, दात मजबूत होतात. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाने रोज एक ग्लास दूध प्यायलाच हवे. परंतु आयुर्वेदानुसार काही शारीरिक समस्या असल्यास दूध पिणे योग्य मानले जात नाही. चला जाणून घेऊया कोणत्या लोकांनी दुधाचे सेवन टाळावे, दूध पिण्याची योग्य वेळ कोणती आणि त्याचे फायदे काय आहेत.

milk
रिकाम्या पोटी बडीशेपचे पाणी पिणे आरोग्यदायी

दूध पिण्याची योग्य वेळ कोणती

जेव्हाही भूक लागेल तेव्हा दूध (Milk) पिऊ शकता, कारण हा संपूर्ण आहार आहे. अन्न खाल्ल्यानंतर भूक न लागता दूध पिणे टाळावे. यामुळे दूध नीट पचत नाही. ते पचले नाही तर सर्दी, खोकला, जुलाब, उलट्या, ताप यासोबतच अपचनाचा त्रास होतो. कारण शरीराला (Fitness) तो न पचलेला पदार्थ बाहेर काढायचा असतो.

कोणी दुध पिऊ नये

ज्या लोकांना दूध पचण्यास त्रास होत असेल त्यांनी दुधात थोडेसे कोरडे आले पावडर टाकून ते उकळून प्यावे. जेवणासोबत दूध कधीही पिऊ नका, त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. दुधासोबत आंबट, खारट पदार्थ कधीही खाऊ नयेत. लोक उन्हाळ्यात मिल्कशेकमध्ये भरपूर मँगो शेक पितात, जे योग्य नाही. दुधासोबत स्ट्रॉबेरी शेक घेणे देखील टाळावे. दुधासोबत लिंबूवर्गीय फळे खाणे टाळावे.

milk
वयाच्या चाळीशीनंतर झोप कमी का होते, जाणून घ्या

गाईचे दूध आरोग्यासाठी उत्तम

गायीचे दूध सर्वोत्तम (Health) आहे. ज्यांना शरीरात खूप उष्णता जाणवते, पोटात जळजळ होते, जे जास्त शारीरिक श्रम करतात त्यांनी दुधाचे सेवन अवश्य करावे. पोटात जळजळ होत असल्यास दुधात थोडासा रुफजा टाकून प्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com