High BP च्या रुग्णांसाठी कॉफी अन् ग्रीन टी, दोन्हीमध्ये काय जास्त फायदेशीर ठरेल?

हृदयरोगी आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी विशेषतः जास्त कॉफी पिणे टाळावे.
High BP
High BPDainik Gomantak

एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जर तुमचा रक्तदाब 160/100 मिमि एचजी किंवा त्याहून अधिक असेल आणि तुम्ही दररोज दोन कपपेक्षा जास्त कॉफी पित असेल तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका दुप्पट असू शकतो.

अभ्यासात असेही म्हटले आहे की जे लोक ग्रीन टी किंवा फक्त एक कप कॉफी पितात, त्यांच्यावर असा प्रभाव दिसला नाही.

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, उच्च रक्तदाब असलेल्या कॉफी पिणाऱ्यांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचा धोका जास्त असतो. पण ज्यांचा रक्तदाब गंभीर नाही अशा लोकांवर त्याचा फारसा परिणाम होत नाही.

अभ्यासादरम्यान संशोधकांना असे आढळून आले लोक दिवसातून फक्त एक कप कॉफी पितात आणि दररोज ग्रीन टीचे सेवन करतात. त्यांना हृदयविकाराचा (Heart Attack) धोका जास्त दिसत नाही तर ते रक्तदाबाचे रुग्ण होते.

ग्रीन टी आणि कॉफी या दोन्हीमध्ये कॅफिन आढळते. ज्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. सुरुवातीच्या 19 वर्षांच्या अभ्यासामध्ये 40 ते 79 वयोगटातील 6,570 पेक्षा जास्त पुरुष आणि 12,000 महिलांचा समावेश होता ज्यांची कॅन्सर जोखीम मूल्यांकनासाठी जपान सहयोगी कोहॉर्ट स्टडीमधून निवड करण्यात आली होती.

High BP
Grandma's Home Remedies: आजींच्या बटव्यातील खास उपाय! 'या' 4 रेसिपी हिवाळ्यात देतील निरोगी आरोग्य

उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी कॉफी पिणे टाळावे

आरोग्य तज्ञांच्या मते हृदयाच्या आरोग्यावर (Health) कॅफीनचे फायदेशीर आणि हानिकारक परिणामांवर अनेक वर्षांपासून संशोधन केले जात आहे. हा अभ्यास त्यांच्याशी सुसंगत आहे. साधारण कप कॉफीमधून सुमारे 80 ते 90 मिलीग्राम कॅफिन मिळू शकते.

यामुळे बीपी, हृदय गती वाढते आणि रक्तवाहिन्या संकुचित होतात. म्हणूनच उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी जास्त कॉफी पिणे टाळावे. कारण जास्त कॉफी प्यायल्याने तुम्ही अति तणावाचे शिकार होऊ शकता. त्याचबरोबर कॅफीनचे अतिसेवन हृदयाच्या आरोग्यालाही हानी पोहोचवू शकते.

  • ग्रीन टीमध्ये कॅफिनचे प्रमाण कमी असते

अभ्यासानुसार असे दिसून आले की हृदयरोगी आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांनी विशेषतः जास्त कॉफी पिणे टाळावे. कॅफीनच्या अतिसेवनाने हृदय गती, रक्तदाब आणि तणावाची पातळी वाढते. तसेच ग्रीन टीमध्ये कॅफिनचे प्रमाण खूपच कमी असते, ज्यामुळे हृदयाच्या गतीवर किंवा चयापचयावर धोकादायक प्रमाणात परिणाम होत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com