Grandma's Winter Home Recipes : देशभरात थंडीचा कडाका पाहायला मिळत आहे. यामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी, रक्तदाब अशा आरोग्याशी संबंधित समस्यांच्या तक्रारी हिवाळ्यात खूप वाढू लागतात. यामुळे योग्य आहाराकडे लक्ष देणे सर्वात महत्वाचे आहे.
यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अनेक हिवाळ्यातील (Winter) सुपरफूडचा समावेश करू शकता. हळद हे त्यापैकीच एक आहे. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, मॅंगनीज, लोह, पोटॅशियम, ओमेगा 3 फॅटी ऍसिडस्, फायबर यासारख्या अनेक महत्त्वाच्या पोषक तत्वांचा हा उत्कृष्ट स्रोत आहे.
तसेच अँटीऑक्सिडेंट, अँटीफंगल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म आढळतात. जे संपूर्ण आरोग्यासाठी (Health) फायदेशीर असतात.
पण हळदीची चव थोडी कडवट असते. त्यामुळे बरेच लोक त्याचा आहारात समावेश करण्यास टाळतात. पण हळदीमध्ये अनेक पोषक घटक असतात.
तसेच जखमेवर उपाय म्हणून वापर केला जातो. म्हणून आज आम्ही असे 4 उपाय घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही हळदीच्या (Turmeric) गुणधर्मांचा आरामात फायदा घेऊ शकता. तेव्हा उशीर न करता, हळदीपासून बनवलेल्या या 4 पदार्थांची रेसिपी विसरू नका.
थंडीत आरोग्यासाठी हळद किती फायदेशीर आहे?
हिवाळ्यात (Winter) तसे तर श्वसनाच्या समस्या सामान्यपणे दिसून येतात. कच्च्या हळदीचे सेवन केल्याने म्युकस उत्पादन वाढते आणि श्वसनमार्गात अडकलेल्या बॅक्टेरियांना बाहेर काढण्यास मदत होते. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे सक्रिय संयुग असते तर त्याचे दाहक-विरोधी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करतात
हळदीचे फायदे
वजन कमी करण्यासाठी
रिसर्च गेटने प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार हळदीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म सर्दी आणि खोकल्यासारख्या संसर्गास कारणीभूत असलेल्या जीवाणूंना रोखतात आणि या समस्यांपासून आराम मिळवण्यास मदत करतात.
हळदीमध्ये असलेले गुणधर्म एंझाइमचे उत्पादन वाढवतात जे शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतात. त्याच वेळी, हिवाळ्यात अनेक लोकांचे मन निस्तेज होते आणि ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ राहतात, अशा परिस्थितीत हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन मेंदूतील (Brain) हार्मोन्सची पातळी वाढवते आणि नवीन न्यूरॉन्सच्या वाढीस मदत करते.
1) हळद चहा
हिवाळ्यात चहा सर्वांनाच आनंददायी वाटतो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या सामान्य चहाच्या जागी हळदीचा चहा घेऊ शकता. रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासोबतच अनेक प्रकारचे संक्रमण टाळण्यास मदत होईल.
हळदीचा चहा कसा तयार करायचा
एका पॅनमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात 2 ते 3 खडी हळदीचे तुकडे टाका. 5 मिनिटे उकळू द्या. तुम्ही गॅस बंद करण्यापूर्वी लगेच एक चमचा मध किंवा लिंबाचा रस घालू शकता. यामुळे चव वाढेल.
2) हळदीचे दूध
शरीराला उबदार ठेवण्यापासून ते सर्दी, खोकला, कफ यांसारख्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी वर्षानुवर्षे हळदीचे दुध वापरले जाते. तुम्हा सर्वांना त्याचे गुणधर्म माहीत असतीलच, त्यामुळे या हिवाळ्यात समस्या टाळण्यासाठी आहारात हळदीच्या दुधाचा नक्कीच समावेश करा.
तयार कसे करायचे ते जाणून घ्या
एक ग्लास दूध उकळवा. आता त्यात १/४ टीस्पून हळद घालून चांगले मिक्स करा. तुम्हाला हवे असल्यास, चव वाढवण्यासाठी तुम्ही एक चमचा मध देखील घालू शकता.
3) हळद आणि गुळाचा हलवा
हिवाळ्यात हळद आणि गूळ हे दोन्ही आरोग्यासाठी (Healthy) खूप फायदेशीर मानले जाते. या दोन्ही सुपरफूडमध्ये (SuperFood) अनेक औषधी गुणधर्म आढळतात. जे हिवाळ्यात होणाऱ्या विविध प्रकारच्या इन्फेक्शनशी लढण्यास मदत करते. तसेच रक्त डिटॉक्सिफाय करते. त्याचबरोबर ते त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे.
अशा प्रकारे हळद गुळाचा हलवा
साहित्य
हळद पावडर
तूप
गूळ
रवा
आवडते ड्रायफ्रुट्स
कृती
सर्वप्रथम रवा कोरडा भाजून वेगळा ठेवा. आता कढईत तूप गरम करा. नंतर त्यात हळद घालून भाजून घ्या. आता त्यात भाजलेला रवा घाला. आवश्यकतेनुसार पाणी घाला आणि किसलेला गूळ घाला आणि सर्व एकत्र मिसळा. आता गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत आणि हलव्याची एकसंधता घट्ट होईपर्यंत गॅस बंद करू नका. तुम्ही डिनरमध्ये सर्व्ह करू शकता.
4) हळदीचे लोणचे
साधारणपणे गुजराती लोकांना हळदीचे लोणचे खूप आवडते. त्यामुळे या हिवाळ्यात तुम्ही तुमच्या आहारात पोषक तत्वांनी युक्त हळदीचे लोणच्या आस्वाद घेउ शकता.
असे बनवा लोणचे
किसलेली कच्ची हळद
चवीनुसार मीठ
लाल तिखट
आले पूड
हिंग
लिंबाचा रस
मोहरीचे तेल
कृती
सर्वात पहिले तवा गरम करून त्यात तेल घालावे. नंतर त्यात हिंग, लाल तिखट, आले पूड आणि मीठ घालून मध्यम आचेवर 1 मिनिट परतून घ्या. मसाले थंड झाल्यावर त्यात हळद आणि लिंबाचा रस घाला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.