नातं टिकवायचंय? या गोष्टीं पाळा नाहीतर, म्हणाल का रे दुरावा!

नात्यात फक्त खूप प्रेम असण्याने सर्व काही घडत नाही कारण दोन व्यक्ती एक झाल्याबरोबर अनेक गोष्टी बदलू लागतात किंवा बदलू शकतात.
How to maintain strong and healthy Relationship Tips in Marathi, Tips To maintain healthy relationship
How to maintain strong and healthy Relationship Tips in Marathi, Tips To maintain healthy relationshipDainik Gomantak
Published on
Updated on

कोणतेही नातं बनवण्यापेक्षा ते नातं टिकवणं जास्त कठीण असतं आणि नातं टिकवण्यासाठी अनेक गोष्टी आवश्यक असतात. खरं तर, नात्यात फक्त खूप प्रेम असण्याने सर्व काही घडत नाही कारण दोन व्यक्ती एक झाल्याबरोबर अनेक गोष्टी बदलू लागतात किंवा बदलू शकतात. अशा परिस्थितीत दोघांनीही नाते सांभाळून पुढे जायला हवे. यामुळे तुमच्या नात्यातील प्रेम अधिक काळ टिकुण राहते. अनेकवेळा नात्यातील वादामुळे नातं अशा टोकाला पोहोचतं की नंतर प्रयत्न करूनही नातं टिकत नाही. अशा स्थितीत नातं कसं सांभाळावं, नात्यामध्ये प्रेम कसं जपावं, याची विशेष काळजी घेतली पाहिजे. तुमचं नातं घट्ट होण्यासाठी तुम्ही या 6 गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी. (Tips To maintain healthy relationship with your partner)

How to maintain strong and healthy Relationship Tips in Marathi, Tips To maintain healthy relationship
World TB Day: टीबीच्या 'या' सामान्य लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

1- विचार करणे- नात्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विचार. तुमचे नाते अधिक घट्ट होते जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराचा मुद्दा बाजूला ठेऊन प्रथम ऐकता आणि त्यांचा विचार करता आणि त्या संबंधित स्वतःमध्ये बदल घडवून आणता. जेव्हा तुम्ही गोष्टींकडे दुर्लक्ष करता आणि तुमच्या जोडीदाराला अधिक प्रेम द्याल आणि त्यांच्या गोष्टी आधी ऐकता, तेव्हा विश्वास ठेवा की प्रेम दिवसेंदिवस वाढतच जाते.(Relationship Tips in Marathi)

2- आत्मविश्वास- नात्यात आत्मविश्वास असणं गरजेची गोष्ट आहे. खरं तर, जेव्हा तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आत्मविश्वास असतो की काहीही झालं तरी तुमच्या नात्यावर कोणत्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही. बहुतेक लोक घाबरतात की त्यांचे नाते कायमचे टिकेल की नाही आणि हा विचार एका क्षणी जबरदस्त होतो कारण जेव्हा तुम्ही स्वतः त्या गोष्टीची काळजी करता तेव्हा ती गोष्ट प्रत्यक्षात येईल अशी तुम्हाला आशा जास्त असते. अशा परिस्थितीत तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराला तुमच्या नात्याबद्दल इतका विश्वास असला पाहिजे की कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही दोघे मिळून ते हाताळु शकताय त्याला एकत्र तोंड देऊ शकता.

How to maintain strong and healthy Relationship Tips in Marathi, Tips To maintain healthy relationship
TB जगातील सर्वात प्राणघातक संसर्गजन्य किलर रोगांपैकी एक

3- संभाषण- बोलण्याने कोणत्याही नात्यातील दुरावा संपू शकतो. अनेकवेळा असे घडते की तुमच्या मनात अशी काही गोष्ट आहे जी तुम्हाला त्रास देत असते पण तुम्ही तुमच्या पार्टनरला त्याची काणकुणही लागू देत ​​नाही. अशा परिस्थितीत प्रकरण सुटण्याऐवजी अधिकच गुंतुन बसते. त्यामुळे गोष्टी नेहमी एकमेकांसोबत शेअर करा. जेनेकरुन दोघांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही.

4- काळजी- नात्यात एकमेकांबद्दल काळजी घेणे खूप महत्वाचे असते. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराची काळजी घेता आणि त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेता तेव्हा काहीही झाले तरी तुमच्यात मतभेद होणार नाहीत. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांच्या छोट्या-छोट्या गोष्टींची विशेष काळजी घेता तेव्हा तुमच्यातील भांडणे कमी होतात आणि तुमचे नाते अतूट राहते.

5- तडजोड- कोणत्याही नात्यात तडजोड ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट आणि घट्ट होते. अनेक वेळा अहंकार आणि हट्टीपणामुळे नातं तुटण्याच्या टोकाला पोहोचतं कारण दोघांपैकी कोणीही तडजोड करायला तयार नसतं आणि आपलं नात आपापल्या जिद्दीला चिकटून राहतं. जिद्द न सोडल्यामुळे बहुतेक नाती ही तुटतातच. अशा परिस्थितीत तडजोड करून तुमचे नाते पुन्हा रुळावरती येऊ शकते.

How to maintain strong and healthy Relationship Tips in Marathi, Tips To maintain healthy relationship
Evening Snacks: संध्याकाळच्या नाश्त्यात चहा सोबत घ्या 'पनीर सँडविच' चा आस्वाद

6- विशेष अनुभूती द्या - रिलेशनशिपमध्ये (Relationship) एकमेकांना स्पेशल वाटणेही महत्त्वाचे असते. यामुळे तुमच्यातील भांडणे, गैरसमज दूर होतात. बऱ्याच वेळा काही काळानंतर नात्यात कंटाळा येऊ लागतो, त्यामुळे नात्यात काही खास राहत नाही आणि अनेकदा भांडणेही वाढतात. अशा स्थितीत तुम्ही एकमेकांना नात्यात स्पेशल वाटण्यासाठी आवडीच्या गोष्टी करा. त्यामुळे नात्यातील आकर्षण कायम राहते आणि प्रेमही वाढते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com