tea
teaDainik Gomantak

Plastic Tea Sieve: प्लास्टिकची चहा गाळणी ठरेल या '5' आजारांचे कारण

जे लोक प्लॅस्टिकच्या गाळणीने चहा गाळून चहा पितात त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते.

Plastic Tea Sieve: तुम्ही चहा प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही चहासोबत 'विष' तर नाही ना घेत आहात याकडे लक्ष द्यावे. प्लॅस्टिक चहाच्या गाळणीने पिलेला चहा अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. त्यामुळे कोणती काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

जेव्हा कोणतेही गरम अन्न किंवा पेय प्लास्टिकच्या संपर्कात येते तेव्हा ते आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते. केवळ चहाचे गाळणेच नाही तर प्लास्टिकचे कप, प्लेट्स आणि चमचे हे देखील अन्न धोकादायक बनवतात. 

कधीकधी चहाचे गाळणे पुनर्नवीनीकरण केलेल्या प्लास्टिकपासून बनवले जाते. तुम्ही चहाला गाळून टाकताच, त्यातील विषारी रसायने तुमच्या कपमध्ये जातात, ज्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात.
 

प्लास्टिक चहा गाळणीचा सतत वापर केल्याने कपमध्ये हजारो मायक्रोप्लास्टिक्स तयार होतात. आपल्यापैकी बरेचजण चहा घेण्यासाठी बाजारात जातात, नंतर तो प्लॅस्टिकच्या पिशवीत पॅक करून घरी किंवा ऑफिसमधेय आणतात. ही पद्धत तुमचे आरोग्य खराब करू शकते. 

  • प्लास्टिक चहा गाळणी वापरण्याचे तोटे

1. कर्करोगाचा धोका 
प्लास्टिकमध्ये मेट्रोसमिन आणि बिस्फेनॉल सारखी हानिकारक रसायने आढळतात. जी आपल्या शरीरात कर्करोग पसरवण्याचे काम करतात, हा एक धोकादायक आजार आहे जो कधीकधी माणसाचा जीव घेतो.

2. गरोदर महिलांना होणार हानी
गरोदर महिलांनी प्लॅस्टिक स्ट्रेनरचा चहा चुकूनही पिऊ नये. कारण ते मायक्रोप्लास्टिक्स न जन्मलेल्या बाळालाही संक्रमित करू शकतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

3. किडनीवर परिणाम
अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे की प्लास्टिकच्या संपर्कात आलेली पेये पिल्याने किडनी खराब होऊ शकते. कारण त्याचा मूत्रपिंडाच्या फिल्टरिंग प्रक्रियेवर परिणाम होतो.

tea
Monsoon Care: पावसाळ्यात ओले शूज सुकवण्यासाठी करा 'हे' 3 देशी जुगाड

4. पुरुषांमध्ये नपुंसकत्व
जर पुरुषांना प्लॅस्टिक गाळणीमधून गाळलेला चहा पिण्याची सवय असेल तर ती ताबडतोब बदला, कारण त्यामुळे नपुंसकत्व येऊ शकते.

5. अपचन
चहाच्या गाळणीतून बाहेर पडणारे मायक्रोप्लास्टिक्स आपल्या आतड्यांचे आरोग्य बिघडवतात, ज्यामुळे आपली पचनक्रिया बिघडू शकते.

6. मेंदूवर परिणाम
प्लास्टिकमध्ये असलेल्या धोकादायक रसायनांचा आपल्या मेंदूवर वाईट परिणाम होतो, त्याचा स्मरणशक्ती आणि एकाग्रतेवर परिणाम होतो.

  • पर्याय म्हणून काय वापरावे

तुम्हा स्टीलची चहा गाळणी वापरू शकता.

काही लोक सुती कापडापासून बनवलेले गाळणे देखील वापरू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com