Monsoon Shoe Care Tips
Monsoon Shoe Care TipsDainik Gomantak

Monsoon Shoe Care Tips: पावसाळ्यात ओले शूज सुकवण्यासाठी करा 'हे' 3 देशी जुगाड

पावसाळ्यात लवकर शूज वाळत नसेल तर ट्रिक्स वापरा.
Published on

How to Take Care of Your Shoes During Monsoon: आपल्यापैकी बहुतेकजण पावसाळ्याची वाट पाहत असतात, कारण तुम्हाला बाल्कनीत बसून रिमझिम थेंबांसह चहा आणि पकोड्यांचा आस्वाद घ्यायचा असतो. 

पण पावसाळा अनेक अडचणी आणि आजार देखील घेऊन येतो. ज्यापैकी एक म्हणजे ओले शूज सुकवणे.

पावसाळ्यात अनेकदा रस्त्यांवर पाणी साचते, अनेकवेळा छत्रीशिवाय घराबाहेर पडताना शूज पूर्ण भिजतात आणि अनेक दिवस ऊन देखील नसते. अशावेळी ओले शूज सुकवण्याचे इतर मार्ग कोणते आहेत हे जाणून घेऊया.

  • पंखाखाली कोरडे करा

पावसाळ्यात बरेच दिवस सूर्यप्रकाश नसतो तेव्हा ओले शूज सुकवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पंखे.

सर्व प्रथम, तुम्ही लेसेस काढा आणि इनसोल काढा आणि शूजसह पंखाखाली ठेवावे. जर तुम्हाला अधिक लवकर कोरडे करायचे असेल तर या गोष्टी टेबल फॅनसमोर ठेवा आणि पंखा चालू करून फुल स्पीडवर ठेऊ शकता.

  • कागदाची मदत घ्या

ओले शूज टिश्यू पेपर किंवा जुन्या वर्तमानपत्रांच्या मदतीने सुकवता येतात. सर्वात पहिले हा कागद शूजमध्ये भरून घ्यावे.यामुळे पाणी शोषले जाईल.

ही पद्धत पुन्हा पुन्हा करावी. ही एक अतिशय प्रभावी पद्धत आहे. जेव्हा ओलावा जवळजवळ निघून जातो, तेव्हा सामान्य खोलीच्या तापमानातही ते सहज कोरडे होईल.

  • हेअर ड्रायर वापरा

​​हेअर ड्रायरचे मुख्य कार्य म्हणजे ओले केस सुकवणे आहे. पण त्याच्या मदतीने तुम्ही ओले शूज देखील सुकवू शकता. शूजच्या आतील बाजूने तसेच बाहेरील बाजूने ड्रायर फिरवावे. यामुळे शूज सुकेल.

  • कॉटनचा नॅपकिन वापरावा

पावसाळ्यात शूज सुकवणे कठिण असते. पण तुम्ही कॉटनच्या नॅपकिनचा वापर करून ओले शूज सुकवू शकता. यासाठी शूजमधील पाणी काढून टाकावे. नंतर शूजमध्ये कॉटनच्या नॅपकिन ठेवावा. यामुळे राहिलेले पाणी शाषुन घेणार.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com