TB On Skin Symptoms: त्वचेवर टीबीची कोणती लक्षणं दिसतात? कारणं आणि कोणती खबरदारी घ्यावी? जाणून घ्या

Skin TB signs: शरीराच्या वेगवेगळ्या भागात टीबीचा संसर्ग झाल्यास वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. टीबी संसर्गाची काही लक्षणे त्वचेवर देखील दिसतात. तथापि, कधीकधी त्वचेच्या संसर्गामुळेही टीबी होऊ शकतो.
TB On Skin Symptoms
TB On Skin SymptomsDainik Gomantak
Published on
Updated on

टीबीचा संसर्ग शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. तथापि, त्याचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे फुफ्फुसांमध्ये होणारा टीबी संसर्ग. शरीराच्या वेगवेगळ्या भागात टीबीचा संसर्ग झाल्यास वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. टीबी संसर्गाची काही लक्षणे त्वचेवर देखील दिसतात. तथापि, कधीकधी त्वचेच्या संसर्गामुळेही टीबी होऊ शकतो. म्हणून, त्वचेवर दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये. लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार सुरु करावेत.

सर्वात सामान्य टीबी संसर्ग फुफ्फुसांमध्ये दिसून येतो. सध्या देशातील लाखो लोक टीबीच्या संसर्गाचे ग्रस्त आहेत. टीबीचे उच्चाटन करण्यासाठी सरकारकडूनही प्रयत्न केले जात आहेत. गाझियाबाद येथील डॉ. अनिल यादव यांच्या मते, फुफ्फुसांव्यतिरिक्त, पोट, यकृत, गर्भाशय, हाडे आणि त्वचेवरही टीबीचा संसर्ग होतो. टीबी संसर्गाची काही लक्षणे त्वचेवर देखील दिसतात. ही लक्षणे ओळखून तात्काळ उपचार सुरु करणे गरजेचे ठरते. मात्र अनेकदा लोक त्वचेवर दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि संसर्ग गंभीर रुप धारण करतो.

TB On Skin Symptoms
Heart Attack: महिलांनो ह्रदयविकाराचा धोका टाळायचाय का? आहारात करा 'या' गोष्टींचा समावेश

ही लक्षणे त्वचेवर दिसतात

डॉ. अनिल यांच्या मते, त्वचेवर टीबी संसर्गाची दृश्यमान लक्षणे म्हणजे लाल पुरळ, जखमा, उठलेले गाठी आणि वेदनादायक व्रण. याशिवाय, त्वचेचा रंग बदलणे हे देखील टीबी संसर्गाचे लक्षण असू शकते. त्वचेवरील टीबी संसर्गामध्ये ल्युपस वल्गारिसचाही समावेश होतो. त्यामुळे त्वचेवर लाल वेदनारहित पुरळ किंवा गाठी दिसून येतात. पुरळ हळूहळू पसरतात आणि त्यांचे रूपांतर अल्सरमध्ये होते. याशिवाय, त्वचेवर स्क्रोफुलोडर्मा होतो, ज्यामध्ये मानेवर आणि खांद्याभोवती गाठी तयार होतात, ज्या नंतर अल्सरमध्ये बदलतात.

TB On Skin Symptoms
Heart Surgery: हृदय शस्त्रक्रियेनंतर आरोग्याची कशी घ्यायची काळजी? आहार कसा ठेवायचा अन् कोणत्या चुका टाळायच्या? जाणून घ्या तज्ञांकडून

लक्षणे दिसल्यास काय करावे

मेडिसिनचे डॉ. सुभाष गिरी सांगतात, जर नमूद केलेली लक्षणे त्वचेवर दिसत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी (Doctor) संपर्क साधा आणि संपूर्ण तपासणी करा. जर टीबी संसर्गाची त्वचेवर लक्षणे दिसली तर तात्काळ उपचार सुरु करावेत. जेव्हा टीबीचा संसर्ग गंभीर रुप धारण करतो तेव्हा उपचार देखील गुंतागुंतीचे होतात. यामध्ये निष्काळजी राहिल्यास जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com