Alert: तुमचा ऑनलाईन फ्रेंड 'चार्ल्स' तर नाही ना? चॅटिंगवेळी 'या' 7 गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष

तुम्ही देखील ऑनलाइन चॅटिंग करत असाल तर या टिप्स नक्की ट्राय करा.
Online chatting |nepal bikini killer charles sobhraj
Online chatting |nepal bikini killer charles sobhraj Dainik Gomantak
Published on
Updated on

देशात सोशल मिडियाचा वापर झपाट्याने वाढला आहे. यामुळे ऑनलाइन फसवणूक देखील वाढत आहे. सध्या ऑनलाइन चॅटिंगमुळे फसवणूकीचे प्रकार खुप वाढले आहेत. एकटेपणाला कंटाळून आजकालची तरूणपिढी कोणासमोरही मनमोकळं करायला तयार असते. त्यांना फक्त त्यांचे म्हणणे ऐकणारे कोणी हवे असते. नेमकी याच मानसिकतेमुळे अनेकदा चुकीच्या व्यक्तिंशी मैत्री होते. त्यामुळे ऑनलाइन मैत्री करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

  • तुम्ही ज्या व्यक्तिशी चॅट करत आहात त्याच्याशी बोलतांना खाजगी गोष्टी शेअर करु नका. जोवर एकमेकांवर विश्वास तयार होत नाही तोपर्यंत या गोष्टींची काळजी घ्या. सर्वसामान्यपणे ऑनलाइन मित्र हे कमी वेळात जास्तीत जास्त गप्पा मारण्याच्या आणि खासगी गोष्टी जाणून घेण्याच्या प्रयत्नांत असतात. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.

  • सुरुवातीला कमी वेळ बोला. बोलायला सुरुवात करण्यापूर्वी त्यांचे प्रोफाइल, फोटो सर्व गोष्टी नीट पाहा. समोरची व्यक्ती खोटे प्रोफाइल ठेवून तर बोलत नाही ना याची खात्री करुन घ्या .

  • ऑनलाइन फ्रेंडला भेटण्याचं प्लॅनिंग करत असाल तर सार्वजनिक ठिकाणीच भेटा. अनोळखी ठिकाणी भेटण्याची समोरची व्यक्ती आग्रह करत असेल तरी तुम्ही स्पष्ट नकार द्या.

Online chatting |nepal bikini killer charles sobhraj
Christmas Food in Goa: गोव्यामध्ये नाताळात हमखास चाखायला मिळतात 'हे' खास गोड पदार्थ
  • आपला मोबाइल नंबर (Mobile Number) सोशल साइटवर चुकूनही टाकू नका. कोणासोबतही नंबर शेअर करताना विचार करुनच करावा.

  • असे अनेक लोक आहेत जे लग्न करण्याचे वचन देतात. मुलींना भेटतात आणि त्यांना आपल्या जाळ्यात अडकवतात. त्यामुळे आपल्या आयुष्यातील एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी समोरची व्यक्ती तेवढी प्रामाणिक आहे की नाही हे नक्की तवासावे .

  • मैत्रीचं नाव सांगून अनेकदा पैसेही हडपले जातात. यामुळे कोणालाही पैसे देतांना विचार करुन द्यावे.

  • ऑनलाइन चॅटिंगवेळी फोटो किंवा व्हिडिओ कॉल करतांना काळजी घ्यावी. लगेच समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेउ नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com