Christmas Food in Goa: गोवा राज्यात सर्वत्र नाताळ सणाची लगबग सुरू आहे. बाजारात सजावटीसाठी लागणारे साहित्य दाखल झाले असून ते खरेदीसाठी गर्दी होत आहे. सोबतच ख्रिस्ती धर्मियांमध्ये आता नाताळानिमित्त विविध प्रकारचे गोड पदार्थ बनविणे सुरू झाले आहे. ज्याप्रमाणे हिंदू लोक गणेश चतुर्थीच्या काळात करंज्या, लाडू, मोदक बनवितात, त्याचप्रमाणे ख्रिस्तीबांधव नाताळनिमित्त विशिष्ट प्रकारचे गोड पदार्थ आवर्जून बनवितात.
गोव्यात नाताळानिमित्त जे गोडपदार्थ बनविले जातात त्यात केवळ एक केक सोडला तर सर्व पदार्थांमध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर प्रामुख्याने केला जातो. खोबऱ्याच्या वापरामुळे सर्व पदार्थांना एक विशिष्ट चव येते. सोबतच हे पदार्थ अतिशय लुसलुशीत, मऊ बनतात.
बिबिन्का, दोदोल, करंज्या, बाथ्क, दॉश, कोकाद, पिनाग, गॉस, रोज कुकी आदी पदार्थांमध्ये प्रामुख्याने ओल्या खोबऱ्याचा वापर केला जातो. त्यासोबतच काही पदार्थांमध्ये अंड्याचादेखील वापर केला जातो. या गोड पदार्थांचे वाटप नाताळाच्या आदल्या दिवशी केले जाते. आपल्या शेजारील कुटुंबियांना, आपल्या मित्रपरिवाराला गोडपदार्थ दिले जातात.
सॅसी सिक्वेरा, पणजी-
पूर्वी शेजारील महिला एकत्र येऊन नाताळानिमित्त गोड पदार्थ बनविले जायचे. प्रत्येक दिवशी एकाच्या घरी जाऊन हे गोडपदार्थ महिला बनवत असत. मात्र आता बहुतांश ठिकाणी प्रत्येकजण आपापल्या घरीच गोड पदार्थ बनवितात.
सिएना डिसोझा-
नाताळानिमित्त गोड पदार्थ बनविण्याचा उत्साह आगळाच असतो. हे पदार्थ चुलीवर केले तर त्याची चव न्यारीच असते. मात्र आता बहुतांश मिठाई, गोड पदार्थ शेगडीवरच केले जातात. चुलीवरील पदार्थ मागे पडले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.