Summer Special Drink: उन्हाळ्याच्या झळा सुरु झाल्या आहेत. शरीराला डिहायड्रेशन ठेवण्यासाठी विविध पेयांचे सेवन केले जाते. बाजारात देखील अनेक प्रकारचे थंड पेय उपलब्ध असतात.
पण हे ड्रिंक्स प्यायल्यानंतर ना तहान भागते ना शरीर ताजेतवाने होते. तुम्हालाही असे वाटत असेल तर या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कैरीच्या पन्ह्याची ही टेस्टी रेसिपी ट्राय करा.
हे पेय चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. नियमित सेवन केल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटण्यासोबतच गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्याही दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया कैरीचे पन्हे कसे बनवायचे.
कैरीचे पन्हे बनवण्यासाठी साहित्य
- 2 कैरी
- 3 टीस्पून ब्राऊन शुगर
- 1 टीस्पून जिरे पावडर
- 2 टीस्पून काळे मीठ
- 1 टीस्पून मीठ
- 2 कप पाणी
- 1 टीस्पून पुदिन्याची पाने
- बर्फाचे तुकडे
टिप: आवड असल्यास गुळ देखील टाकु शकता.
कैरीचे पन्हे बनवण्याची सोपी पद्धत
कैरीचे पन्हं बनवण्यासाठी प्रथम पॅनमध्ये पाणी टाकून कैरी उकळून घ्यावी.
कैरी मंद आचेवर सुमारे 10 मिनिटे शिजवल्यानंतर जेव्हा ते मऊ होईल तेव्हा गॅस बंद करुन ते थंड होण्यासाठी ठेवा.
आता चमच्याच्या साहाय्याने कैरीचे साल सोलून घ्या आणि कैरीचा गर ग्राइंडरमध्ये योग्य प्रमाणात पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा.
ही पेस्ट एका पातेल्यात काढून ब्राउन शुगर घालून गॅसवर शिजवा.
कैरीसोबत साखर पूर्णपणे विरघळली की गॅसवरून पॅन काढून त्यात जिरेपूड, काळे मीठ आणि मीठ टाका.
नतंर एका ग्लासमध्ये दोन चमचे कैरीची पेस्ट टाका आणि त्यात थंड पाणी घालून चांगले मिक्स करा.
पुदिन्याच्या पानांनी सजवून सर्व्ह करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.