Health Tips: टाचदुखीने त्रस्त आहात? करा घरच्या घरी 'हे' उपाय

टाचदुखीच्या समस्येचे मुख्य कारण म्हणजे वाढलेले यूरिक अॅसिड (Uric Acid) हे असू शकते.
Health Tips
Health TipsDainik Gomantak

ठराविक वयानंतर शरीराचे स्नायू दुखणं, सुजणं, बधिर होणं अशा समस्या सुरु होतात. विशेषतः हात-पाय आणि टाचा दुखण्याची समस्या उद्भवते. ही समस्या फक्त महिलांनाच आहे असे नाही, पुरुषांनाही टाचदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. जरी ही वेदना दिवसभर उद्भवत असली तरी, सकाळच्या वेळी मात्र हा त्रास असह्य होतो. टाचदुखीच्या समस्येचे मुख्य कारण म्हणजे वाढलेले यूरिक अॅसिड (Uric Acid) हे असू शकते. ज्या लोकांचे युरिक ऍसिड खूप वाढते, त्यांना दिवसाही तीव्र वेदना आणि टाचदुखीची समस्या असते.

आपल्या देशात आजार आणि रुग्णांच्या वाढत्या संख्येचे कारण चुकीची जीवनशैली आहे. प्राचीन काळी लोक साधी पण वैज्ञानिक जीवनशैली जगत होते. आताच्या काळात ज्या स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यासाठी कुकरचा वापर केला जातो, तेथे असे अनेक आजार सुरु झालेले पाहायला मिळतात

आयुर्वेदात काय सांगितलंय?

आयुर्वेदाच्या मते युरिक अॅसिड वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे कुकरमध्ये शिजवलेल्या मसूरच्या डाळीचे अतिरिक्त सेवन करणे. डाळींचे, फुलकोबीचे अतिरिक्त सेवन युरिक अॅसिडची पातळी झपाट्याने वाढवतात.

Health Tips
Health Tips: कडूलिंबाचे आश्चर्यकारक फायदे आणि उपयोग माहित आहेत का? वाचा सविस्तर...

आयुर्वेदानुसार युरिक ऍसिडवर उपचार कसे करावे?

• जीवनशैलीत सुधारणा करा. जसे की, झोपण्याची आणि उठण्याची आणि खाण्यापिण्याची वेळ निश्चित करा.

• हिरव्या भाज्या, सुका मेवा, ताजी फळे, दुग्धजन्य पदार्थ यांचा आहारात समावेश करा.

• डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नका.

Health Tips
Dry Skin: घरगुती उपायांनी कोरड्या त्वचेपासून मिळवा सुटका, करा 'हे' उपाय

या व्यतिरिक्त आपण टाच दुखीवर खालील उपाय करू शकतो:-

  • टाचदुखी हा वाताचा एक प्रकार आहे. त्यामुळे अनेक वेळा हिवाळा किंवा पावसाळा या ऋतूंमध्ये टाचदुखीची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवते. त्यामुळे घरामध्ये असताना कायम मऊ चपल किंवा स्लीपरचा वापर करावा.

  • टाच दुखत असताना कोमट पाण्यामध्ये खडे मीठ टाकावे आणि या पाण्यामध्ये १५ ते २० मिनीटे पाय टाकून बसावे. या पाण्यामुळे पायांना शेक मिळाल्यानंतर टाचदुखी काही प्रमाणात कमी होते.

  • विटेचा एक तुकडा थोडासा गरम करुन त्यावर रुईचे पान बांधावे आणि त्याचा शेक टाच दुखत असलेल्या भागावर द्यावा.

  • गोडेतेल आणि मीठ एकत्र करुन हा लेप टाचेवर लावाला आणि टाच सुती कापडाने बांधून ठेवावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com