Health Tips: कडूलिंबाचे आश्चर्यकारक फायदे आणि उपयोग माहित आहेत का? वाचा सविस्तर...

कडूलिंब हा वृक्ष अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म धारण करणारा म्हणून ओळखला जातो.
Health Tips
Health TipsDainik Gomantak
Published on
Updated on

कडूलिंब हा वृक्ष अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म धारण करणारा म्हणून ओळखला जातो. हे खरे असले तरी कोणत्या विकारावर कडूलिंबाचा कसा वापर करावा, याचे ज्ञान नसल्यामुळे आपल्या आसपास अनेक झाडे असूनही आपण त्याचा वापर करत नाही.  कडूलिंबाचा सर्वात मोठा वापर म्हणजे सौंदर्यपिटीका कमी करणे.

तारुण्यपिटिकावर उपयोगी-

काही वेळा तारुण्यपिटिकामुळे चेहरा काळा पडतो. अशा अडचणींवर कडूलिंबांचा उपयोग होतो. कडूलिंबाची काही पाने गोळा करावीत आणि ती पाण्यात टाकावीत. पाणी गरम करावे. प्रदीर्घकाळ पाणी गरम केल्यास लिंबाच्या पानांचा हिरवेपणा कमी होतो. म्हणजेच पानांचा अर्क पाण्यात उतरलेला असतो. या पाण्याने चेहरा धुवावा. मुरुम कमी होतात.

त्वचेच्या तुकतुकीतपणासाठी-

कडूलिंबाची काही पाने टाकून उकळलेले पाणी अंघोळीच्या पाण्यात मिसळावे किंवा बाथटबमध्ये टाकावे. त्याचा वेगळा उपयोग त्वचेला होतो. लिंबू, चंदन, हळद यांचा वापर चेहर्‍याच्या सौंदर्यासाठी होतो किंवा त्वचेच्या तुकतुकीतपणासाठी होतो.

Health Tips
Arambol: अखेर 'त्या' विदेशी पर्यटक विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल

संसर्ग कमी करण्यासाठी-

कडूलिंबामुळे शरीराला त्रस्त करणारे काही संसर्ग कमी होतात. म्हणजे कडूलिंब आपल्या त्वचेवरची इन्फेक्शन्स् कमी करतो. परिणामी इन्फेक्शनमुळे होणारे त्रास वाचतात. आपल्या शरीरावर पडणार्‍या सुरकुत्या किंवा पांढरे छोटे डाग हे आपल्या शरीरातल्या काही प्रक्रियांमुळे पडत असतात. ही प्रकिया कडूलिंबाच्या पानाच्या या पाण्यामुळे मंदावते.

Health Tips
Mahadayi Water Dispute: '..तर राज्यातील चाळीसही आमदारांनी घरी बसावे'

कर्करोगाशी लढायला मदत-

कडुलिंब कर्करोगाच्या पेशी नष्ट करते. प्रत्येकाच्या शरीरात कर्करोगाच्या पेशी असतात, परंतु सामान्यत: त्या विस्कळीत अवस्थेत असतात. जोपर्यंत या पेशी एकट्याने फिरत आहेत तोपर्यंत काही अडचण नाही. जर त्या सर्व एका ठिकाणी एकत्र जमल्या आणि त्यांचे संघटन झाले तर ही एक समस्या बनते. दररोज कडुनिंबाचे सेवन केले तर कर्करोगाच्या पेशींची संख्या एका मर्यादेच्या आत ठेवते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com