Massage Benefits: रोज तिळाच्या तेलाने तळवे मसाज कल्याने होतील आश्चर्यकारक फायदे

Sesame Oil Benefits: तिळाच्या तेलाने मसाज केल्याने पाय दुखण्यासोबतच शरीराच्या इतरही अनेक समस्या दूर करू शकतात.
 Benefitis of Oil massaging on feet
Benefitis of Oil massaging on feet Dainik Gomantak
Published on
Updated on

तिळाच्या तेलाने मसाज करणे आरोग्यासाठी खूप गुणकारी ठरू शकते. विशेषतः जर तुम्हाला शारीरिक थकवा येत असेल तर तिळाच्या तेलाने नियमित मसाज करायला हवी. यासोबत तिळाच्या तेलाने मसाज केल्याने डोळ्यांच्या समस्या कमी होउ शकतात. यासोबतच चिडचिडेपणाही दूर होम्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला तिळाच्या तेलाने (Sesame Oil) मालिश करण्याचे आरोग्यदायी (Health) फायदे सांगणार आहोत. 

  • तिळाच्या तेलाने मालिश करण्याचे काय फायदे आहेत?

तिळाच्या तेलाने पायाच्या (legs) तळव्याला मसाज केल्याने तुमच्या आरोग्याला खूप फायदा होतो. दृष्टी सुधारण्यासोबतच लठ्ठपणावर नियंत्रण ठेवता येते. चला जाणून घेऊया त्याचे फायदे-

तिळाच्या तेलाने तळवे मसाज केल्याने तुमची दृष्टी वाढू शकते. विशेषतः जर तुम्ही सतत कॉम्प्युटरवर काम करत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या डोळ्यांवर (Eyes) होऊ शकतो. यामुळे तळव्यावर तिळाच्या तेलाची मालिश करा. यामुळे डोळ्यांचा थकवा, जळजळ आणि जडपणा दूर होतो. 

  • चिडचिड निघून जाते 

रोज रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना तिळाच्या तेलाने मसाज केल्यास दिवसभराच्या थकव्यामुळे होणारी चिडचिडही दूर होते. मसाज केल्याने तुमच्या पायाचे स्नायू शिथिल होतात आणि पायाच्या तळव्यामध्ये असलेल्या काही नसा मेंदूकडे (Brain) जातात आणि मसाज करताना ते शांत होते. यामुळे तुमच्या मेंदूला आराम मिळतो. 

 Benefitis of Oil massaging on feet
World Egg Day 2022: नाश्त्यात अंडी खायला आवडतात? अशा प्रकारे बनवा अंड्याचा चविष्ट नाश्ता
  • शरीराची सूज कमी करा

दिवसभराच्या धकाधकीच्या जीवनात पायांवर खूप परिणाम होतो. तिळाचे तेल तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या तेलाने तळवे मसाज केल्याने शरीरातील सूज आणि तळवे दुखण्यापासून आराम मिळतो. 

  • पोटाची चरबी कमी करा

तिळाच्या तेलाने मसाज केल्याने तुमच्या पोटाची आणि शरीराची चरबी कमी होण्यास मदत होते. हे तेल तुमच्या शरीराला उबदारपणा देते, जे तुमच्या शरीरातील चरबी कमी करण्यात प्रभावी ठरू शकते. तिळाच्या तेलामध्ये असलेले पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स जलद वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com