World Egg Day 2022: नाश्त्यात अंडी खायला आवडतात? अशा प्रकारे बनवा अंड्याचा चविष्ट नाश्ता

रोज एक उकडलेले अंडे खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता सुधारते. वजन कमी करण्याच्या आहारात देखील अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो.
World Egg Day 2022
World Egg Day 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

रोज अंडी खायला हवीत असा सल्ला दिला जातो. अनेकांना नाश्त्यात तेलकट पदार्थ खायला आवडत नाहीत ते, सहसा उकडलेली अंडी खातात. अंड्याची करी ऑम्लेटपेक्षा जास्त आरोग्यदायी आहे कारण त्यात प्रथिने, हेल्दी फॅट आणि आवश्यक पोषक घटक असतात. रोज एक उकडलेले अंडे खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता सुधारते. वजन कमी करण्याच्या आहारात देखील अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो.

भुर्जी किंवा स्क्रॅम्बल्ड अंडी खायला जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही अर्धे शिजवलेले अंडे देखील खाऊ शकता. हे ऑम्लेटसारखेच असते, परंतु अंड्याचा पिवळा भाग गोल आणि अर्धा शिजलेला असतो. कढईत थोडे तेल टाकून गरम करा. एक अंडे फोडून त्यात टाका. तिखट, काळी मिरी पावडर, मीठ घालून मंद आचेवर झाकून ठेवा आणि एक मिनिट तसेच राहू द्या. अर्धे शिजवलेले अंड्यात जास्त कॅलरिज असतात.

World Egg Day 2022
Palak Paratha Recipe : पौष्टिकतेने समृद्ध पालक पराठा बनवा या सोप्या स्टेप्ससह!

स्क्रॅम्बल्ड एग - हे भुर्जीपेक्षा खूप वेगळे आहे. भुर्जीपेक्षा स्क्रॅम्बल्ड अंडी हेल्दी आणि चविष्ट असते. तेलही कमी लागते. एका भांड्यात अंडी फोडून घ्या. पॅनमध्ये ठेवा, काही मिनिटे हलवा, तुमचे स्क्रॅम्बल्ड अंडी तयार आहे. 2 अंड्यांपासून बनवलेल्या स्क्रॅम्बल्ड अंड्यामध्ये सुमारे 145 कॅलरीज आणि 10 ग्रॅम फॅट असते, जे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते.

पोच केलेले अंडी देखील नाश्त्यासाठी उत्तम मानली जातात. पोच अंडी तयार करण्यासाठी तेलाची गरज लागत नाही. गरम पाण्यात अंडी फोडून 2-3 मिनिटे झाकून ठेवा. तुमची पोच अंडी तयार होतील. अंडी प्लेटमध्ये काढून घ्या आणि त्यावर मीठ, मिरी पावडर टाकून खा.

World Egg Day 2022
Tips for Diwali Gift: दिवाळीत चुकूनही घेऊ किंवा देऊ नका असे गिफ्टस्, द्याल संकटाला आमंत्रण

नाश्त्यात ऑम्लेट जास्त खाल्ले जाते. ऑम्लेट बनवण्यासाठी तुम्ही अंड्यामध्ये काही बारीक चिरलेल्या भाज्या देखील घालू शकता. ऑम्लेटमध्ये कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, कोथिंबीर, हिरवी मिरची घातल्यास अधिक चविष्ट होतात. फक्त एक काळजी घ्या अंडी जास्त काळ शिजवू नका नाहीतर त्यातील सर्व पोषक तत्वे नष्ट होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com