Weekend ला करा 'केशर भाता' चा प्लॅन

या वीकेंडला तुम्ही केशर भात बनवायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
Kesar Bhat
Kesar Bhat Dainik Gomantak

प्रत्येक वीकेंडला नवीन काय बनवायचे हा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो. तुम्ही जर एकच एकाच गोड पदार्थ खाऊन कंटाळले असाल तर या वीकेंडला केशर भात (Kesar Rice) नक्की बनवून पहा. केशर भात बनवायला अगदी सोपा आणि चवदार (Testy) असल्याने सर्वांच्या आवडीचा असतो.

केशर भात बनवण्यासाठी साहित्य

* 1 वाटी - उकडलेला तांदूळ (बासमती तांदूळ)

* 1/2 वाटी - साखर

* 10-12 - केशर

* 4-5 - विलायची

* 4 - लवंग

* 6- 7- बदामचे तुकडे

* 7 -8 पिस्त्याचे तुकडे

* 2 चमचे- देशी तूप

* 2 चमचे- कोमट दूध-

* पिवळा रंग

Kesar Bhat
Weight Loss: लठ्ठपणा टाळण्यासाठी सुपरफास्ट टिप्स करा फॉलो

* कृती

सर्वात पहिले एका भांड्यात दूध घ्यावे आणि त्यात 10-12 केशरच्या कड्या टाकावे. नंतर बाजूला काढून ठेवावे. यानंतर साखरेचा पाक तयार करून घ्यावा. साखरेच्या पणयाला उकळी आल्यावर त्यात तांदूळ टाकून शिजू द्यावे. नंतर यात केशरचे दूध टाकावे. चांगले एकजीव झाल्यानंतर हा भात एका बाउलमध्ये काढून घ्यावे. नंतर तुप गरम झाल्यावर त्यात लवंगा टाका, हे मिश्रण केशर भाताची चव अधिक वाढवते. सर्व्ह करण्यापूर्वी त्यावर ड्रायफ्रुट्स टाकून सजवा आणि आस्वाद घ्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com