जर तुम्ही एखादा सोपा व्यायाम (Exercise) किंवा वर्कआऊट (workout) शोधत असाल जे करणे सोपे असून त्याचे आरोग्यासह (Health) अनेक फायदे आहेत. तर चालणे हा जबरदस्त व्यायाम आहे. नियमित चालल्याने मधुमेह, रक्तदाब, ह्रदयाचे आरोग्य, मूत्रपिंडाचे आरोग्य आणि कर्करोग यासारख्या अनेक आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. पण तुम्हाला उलटे चालणे (Reverse walk) म्हणजेच मागच्या बाजूने चालण्याचे फायदे माहिती आहेत का? उलटे चालल्याने केवळ शारीरिक आरोग्यच (Physical health) नव्हे तर मानसिक आरोग्य (Mental health) देखील चांगले राहते. हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. कारण जेव्हा आपण उलटे चालतो तेव्हा ते सर्वोत्तम कार्डिओ वर्कआउट मानले जाते. यामुळे आपले मन आणि शरीर रिलैक्स (Relax) होण्यास मदत मिळते.
* पाठ दुखी कमी होते
जर तुम्हाला पाठ दुखीचा त्रास असेल तर तुम्ही उलटे चालावे. असे केल्याने पाठीवरील ताण कमी होऊन स्नायू सुरळीत काम करतात . यामुळे उलटे चालणे (Reverse walk) आरोग्यासाठी लाभदायी ठरते.
* गुडघेदुखी कमी होते.
उलटे चालल्याने (Reverse walk) गुडघ्यातील दुखणे कमी होण्यास मदत मिळते. जेव्हा आपण उलटे चालतो तेव्हा गुडघ्यावरील ताण कमी होतो. त्यामुळे गुडघ्यावरील सूज कमी होते. ज्या लोकांना गुडघ्याचा त्रास होतो त्या लोकांनी उलटे चालावे. पण असे करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.
* पाय मजबूत होतात
दोन्ही पायांच्या दोन्ही बाजूंच्या स्नायूचा व्यायाम होणे आवश्यक आहे. आपण नेहमी सरळच म्हणजे समोरच्या दिशेने चालतो. यामुळे पायाच्या समोरील बाजूच्या स्नायूचा व्यायाम होतो. तसेच उलटे चालल्याने (Reverse walk) मागच्या बाजूच्या स्नायूचा व्यायाम होतो. यामुळे पाय मजबूत होऊन पायाची ताकद वाढते.
* मानसिक आरोग्य चांगले राहते
उलटे चालणे (Reverse walk) फक्त शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठी सुद्धा चांगले आहे. जेव्हा आपण मागच्या दिशेने चालतो तेव्हा आपल्या शरीराला समन्वय राखण्याचे आव्हान मिळते. यामुळे आपले मन काळजीपूर्वक चालण्याचा सल्ला देते. सर्व लक्ष त्यावर केंद्रित होते. यामुळे तुमचे टेंशन कमी होऊन मन प्रसन्न होते. तसेच अनेक फायदे देखील होतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.