Left Over Chapati Breakfast Recipe: रोज सकाळी नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो.तुम्ही जर रोज पोहे, उपमा, समोसा खाऊन बोर झाले असाल तर आज आम्ही तुम्हाला एक नवी रेसिपी सांगणार आहोत.
तुम्ही रात्री उरलेल्या चपातीपासून स्वादिष्ट उपमा बनवू शकता. हा उपमा बनवायला सोपा असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया उरलेल्या चपातीपासून उपमा कसा बनवावा.
लागणारे साहित्य
4 चपाती
1 कांदा बारीक चिरलेला
1 टोमॅटो बारीक चिरून
2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
अर्धी शिमला मिरची बारीक चिरून
1/2 टीस्पून मोहरी
अर्धा कप वाटाणे
1 टेबलस्पून शेंगदाणे
1 टीस्पून धणे पावडर
1/2 टीस्पून लाल तिखट
1 टीस्पून लिंबाचा रस
2 टेस्पून तेल
सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मीठ
कृती
सर्वात पहिले चपात्यांचे छोटे तुकडे करून घ्यावे.
नंतर गॅसवर पॅनवर ठेऊन तेल गरम करावे.
त्यात मोहरी टाकावी.
मोहरी तडतडल्यावर त्यात हिरव्या मिरच्या आणि कांदे घालून मध्यम आचेवर शिजवावे.
कांदे तपकिरे होईपर्यंत शिजु द्यावे, नंतर टोमॅटो, सिमला मिरची आणि वाटाणे घालून 3 मिनिटे शिजवावे.
यानंतर पॅनमध्ये धणे, लाल तिखट आणि शेंगदाणे घालून एक मिनिट शिजवावे.
आता चपातीचे तुकडे आणि मीठ घालून मिक्स करा. 2 मिनिटे शिजवा आणि गॅस बंद करा.
उरलेल्या चपातीपासून गरमागरम उपमा तयार आहे. हिरव्या कोथिंबीरीने सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.