Morning Healthy Tips: अनेक लोक फिट राहण्यासाठी विविध उपाय करत असतात. जसे की जीमला जाणे, योगा करणे, पोषक आहार घेणे यासारखे उपाय करतात.
पण तुम्हाला माहिती आहे का सकाळची सुरूवात दही खाल्याने केल्याने तर अनेक फायदे मिळू शकतात.
दही खाणे आरोग्यासाठी फायेशीर आहे. पण सकाळी दही खाण्याचे नेमके फायदे कोणते आहेत हे जाणून घेऊया.
सकाळी दही खाण्याचे फायदे
ज्या लोकांना आपले वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठा हा उपाय फायदेशीर आहे. दही हा एक उत्तम पर्याय आहे. दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. यामुळे पोट भरल्यासारखे वाटते बरात वेळ भूक लागत नाही. तसेच दिवसभर खाण्यावर नियंत्रण राहते.
दह्याचा समावेश आहारात करणे फायदेशीर असते. तुम्ही दही साधे किंवा सॅलेडमध्ये टाकून खाऊ शकता. दह्याचे आरोग्यानुसार असंख्य फायदे देऊ शकते.
अनेक लोकांना सकाळच्या धावपळीत सकाळचा ब्रेकफास्ट करणे शक्य नसते.दही हा एक उत्तम पर्याय आहे. दह्यासह तुम्ही वेगवेगळे टॉपिंग करून तुम्ही दही खाऊ शकता. तसेच तुमची टेस्टी रेसिपीही तयार होईल आणि तुम्ही निरोगी राहाल.
दह्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. तसेच बी12 व्हिटॅमिन ,मॅग्नेशिअम सारख्या अनेक पोषक घटक दह्यात असतात. हे घटक हाडांच्या आरोग्यसाठी फायदेशीर असते. तसेच तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते.
दह्यामध्ये असलेले पोषक घटक आतडे निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असते. तसेच पचनसंस्था सुरळित कार्य करते.
या पदार्थासह दही खाणे टाळावे
जे लोक लठ्ठ आहेत, कफाची समस्या आहे, ज्यांना रक्तस्रावाचा विकार आहे किंवा जळजळ होण्याची समस्या आहे, त्यांनी दही खाऊ नये.
दही रात्री कधीही खाऊ नये.
दही रोज खाऊ नये. जर तुम्हाला दही आवडत असेल तर रोज ताक प्या आणि त्यात काळे मीठ, काळी मिरी आणि जिरे घालायला विसरू नका.
दह्यात फळे (Fruits) कधीही टाकू नका. जर तुम्ही हे दीर्घकाळ केले तर चयापचय समस्या आणि एलर्जी देखील होऊ शकते.
दही मांस (Fish) किंवा मासेसोबत खाऊ नये. चिकन, मटण किंवा मासेसोबत दह्याचे मिश्रण शरीरासाठी विषारी असू शकते
(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.