Monsoon Tips: ट्रेकिंगला जातांना 'या' वस्तूंना करा तुमचा मित्र

पावसाळ्यात तुम्हीही ट्रेकिंगला जाण्याचा विचार करत असाल तर या गोष्टींची माहिती करून घ्यावी.
monsoon trekking tips
monsoon trekking tipsDainik Gomantak
Published on
Updated on

Monsoon Trekking Tips: पावसाळा सुरु झाला असून अनेल लोक फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. अनेक लोक डोंगराळ भागात फिरायला जाण्याचा विचार करतात. तर अनेक लोक ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करतात.

पण पावसाळ्यात ट्रेकिंगला जाण्यासाठी खास काळजी घेणे महत्वाचे असते. पण अनेक वेळा गरजेच्या वस्तु आपण विसरतो. पावसाळ्यात ट्रेकिंगला जाण्यासाठी कोणता काळजी घ्यावी हे जाणून घेऊया.

1. ज्या ठिकाणी जाणार त्याची माहिती घ्यावी

ट्रेकिंगला जाण्यापुर्वी त्या ठाकाणाची माहिती करून घ्यावी. त्या ठिकाणी पर्यटन सुरू आहे याची खात्री करावी. तसेच तुम्ही ज्याठिकाणी जाणार आहात त्याठिकाणचे बुकिंग अगोदरच करुन ठेवा. यासाठी तुम्ही ऑनलाइन देखील बुकिंग करु शकता.

2. शूज

पावसाळ्यात ट्रेकिंगला जाताना शूज वापरावे. ज्यामुळे तुम्ही कितीही चाललात तरी तुमच्या पायाला आराम मिळेल. तसेच तुमच्या घोटांनाही सुरक्षा देतील. तसेच शूज कोणत्याही परिस्थितीत घसरणार नाही.

3. ड्रायफ्रुट्स

ट्रेकिंगला जाताना पावसाळ्यात आपल्यासह काही खाद्यपदार्थ ठेवावे. एखाद्यावेळेस भूक लागली असल्यास आपल्या जवळ आपला खाऊ असल्यास आपण तो खाऊ शकतो. त्यामुळे सोबत खाद्य पदार्थ ठेवणे गरजेचे आहे.

monsoon trekking tips
Utensil Cleaning Tips: 'या' 5 गोष्टींचा वापर भांड्यावर आणेल चमक

4. गरजेच्या वस्तू

पावसाळ्यात फिरायला कुठेही जाताना सोबत एक उत्तम प्रतीची बॅग सोबत ठेवावी. यामध्ये तुम्हाला तुमच्या इलेक्ट्रिकच्या तसेच मौल्यवान वस्तू ठेऊ शकता. तेसच त्यामध्ये मोबाईल, मोबाईलचा चार्जर, हेडफोन, कॅमेरा, बॅटरी किंवा फ्लॅश लाइट या वस्तू बॅगमध्ये असणे फार गरजेचे आहे. पावसात भिजल्यास त्या वस्तु खराब होणार नाही.

5. कपडे

पावसाळ्यात कपड्याची निवड करताना हलके कपड सोबत ठेवावे. तसेच हलकेच कपडे परिधान करावेत. ट्रेकिंगला गेल्यावर घट्ट कपडे परिधान करु नये. घट्ट कपड्यांमुळे स्नायुंची हालचाल कमी होऊन ताण येऊ शकतो. त्यामुळे हलके आणि मोकळे कपडे घालावे. हलके कपडे शरीराला चिटकत नाहीत. ट्रेकिंग करणे अवघड जात नाही.

6. औषध

पावसाळ्यात कुठेही बाहेर फिरायला जाताना तुमच्या सोबत औषध ठेवणे गरजेचे आहे. जर कोणाची तब्बेत बिघडली तर वेळेवर धावपळ होणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com