5 Healthy Drinks: स्वत:ला एनर्जेटिक ठेवायचे असेल तर सकाळी 'या' 5 पेयांचे करा सेवन

5 Healthy Drinks: रोज सकाळी हे पेय प्यायल्यास तुम्हाला उर्जा मिळेल आणि वजन देखील कमी होईल.
Healthy Drinks
Healthy DrinksDainiki Gomantak

5 Healthy Drinks: सकाळी पोट रिकामे असते आणि अशा वेळी पचन सुधारणारे हेल्दी ड्रिंक्स पिणे वजन कमी करण्यास फायेदशीर ठरते. ही पेये शरीराची पचनक्रिया मजबूत करतात. ज्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते. 

या पेयांमध्ये कमी कॅलरीज असतात. ज्यामुळे दिवसाच्या सुरुवातीलाच कॅलरीजचे प्रमाण कमी होते. चयापचय वाढवून अधिक कॅलरीज बर्न करण्यास मदत करते.

तसेच, सकाळी या पेयांचे पोषक द्रव्ये शोषून घेण्याची क्षमता शरीरात चांगली असते. त्यामुळे सकाळी योग्य पेये घेतल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.  

  • लिंबु पाणी

सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करून  प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.


  • हळदीचे पाणी

हळदीच्या पाण्यात कर्क्युमिन असते. जे शरीरातील जळजळ कमी करते आणि वजन कमी करण्यास मदत करते. गरम पाण्यात अर्धा चमचा हळद मिसळून प्यावे. त्याऐवजी तुम्ही हळदीचा चहाही पिऊ शकता.

हळदीचा चहा बनवण्यासाठी एक चमचा हळद एक चमचा मध, दालचिनी आणि २ कप पाणी घालून शिजवा. त्यात थोडी आले पावडरही टाकू शकता. हे सर्व चांगले शिजवून प्या. 

  • ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. जे चयापचय वाढवतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात. पोटाची चरबी कमी करण्यासाठी ग्रीन टीचा आहारात समावेश करा.  

Healthy Drinks
Healthy Tips: दुपारची झोप 'या' लोकांसाठी फायदेशीर, दूर होतात अनेक समस्या
  • जिरा पाणी

जिरेचे पाणी पचन सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते. रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे भिजवून सकाळी प्यावे. जिरे पचनशक्ती वाढवते आणि हळूहळू पचणारे अन्न सहज पचण्यासही मदत करते. तसेच आतडे स्वच्छ ठेवण्यास मदत होते.

जिऱ्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ज्यामुळे शरीरातील सूज कमी होते. हे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला गती देते.  

  • पुदिन्याचे पाणी

पुदिन्याचे पाणी पचन सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते. पुदिन्याची पाने कोमट पाण्यात मिसळून रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com