Healthy Tips: दुपारची झोप 'या' लोकांसाठी फायदेशीर, दूर होतात अनेक समस्या

Healthy Tips: दुपारची झोप काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.
Healthy Tips
Healthy TipsDainik Gomantak

Healthy Tips: दुपारी अनेक लोकांना झोपण्याची सवय असते. पण दुपारी झापणे काही लोकांसाठी घातक तर काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. दुपारी झोप घेतल्याने अनेक समस्या देखील कमी होऊ शकतात.

अनेक लोक थकवा दूर करण्यासाठी आणि फ्रेश वाटण्यासाठी दुपारी झोप घेतात. पण तज्ञांच्या मते दुपारी झोप घेणे कोणासाठी फायदेशीर आहे हे जाणून घेऊया.

  • या लोकांनी घ्यावी दुपारची झोप

गरमीमुळे थकवा आल्यावर झोप घ्यावी.

व्यायाम किंवा प्रवासानंतर झोप घेऊ शकता.

अशक्तपणा वाटत असेल तर दुपारची झोप घ्यावी.

वृद्ध आणि लहान मुलांनी दुपारची झोप घ्यावी.

पोटासंबंधित आजार असलेल्या लोकांना अशक्तपणा येतो.त्यांनी दुपारची झोप घ्यावी.

Napping
NappingDainik Gomantak
Healthy Tips
Krishna Janmashtami 2023: जन्माष्टमीला 'या' चुका करणे टाळा, अन्यथा...
  • दुपारी झोपणे टाळावे

आयुर्वेदामध्ये दिवसा झोपणे आरोग्यदायी मानले जात नाही. ज्या लोकांना दुपारी झोपण्याची सवय असते त्यांची पचनशक्ती कमजोर होते. अशा लोकांना कफचा त्रास होतो. त्यामुळे जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असेल तर लगेच बंद करा.

  • रात्री शांत झोप येत नाही

दुपारची झोप घेतल्याने शरीरालाआराम मिळतो. तसेच थकवा दूर होता. पण दुपारी झोपल्याने रात्री शांत झोप येत नाही. यामुळे ज्या लोकांना रात्री शांत झोप येत नाही त्या लोकांनी दुपारी झोपणे टाळावे.

  • या लोकांनी दुपारी झोपू नये

हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्या रुग्णांनी दुपारी झोप घेऊ नये.

लठ्ठपणाची समस्या असलेल्या लोकांनी दुपारी झोपु नये.

खुप जास्त जेवण केल्यावर दुपारी झोपणे टाळावे.

  • दुपारी झोपल्याने कोणते आजार उद्भवतात

पचनासंबंधित आजार वाढू शकतात.

दुपारी झोपल्याने डोकेदुखी वाढू शकते

दुपारी जास्त वेळ झोपल्याने अंगदुखी होऊ शकते.

दुपारी झोपल्याने आळस येतो.

दुपारी झोपल्याने मायग्रेनचा त्रास वाढू शकतो.

  • दुपारची झोप कधी योग्य?

आयुर्वेदानुसार दुपारी झोप घेणे आरोग्यासाठी घातक मानले जाते. ऊन्हाळ्यात दुपारी थोडावेळ झोप घेऊ शकता. पण पावसाळा आणि हिवाळ्यात दुपारी झोप घेणे टाळावे. कारण या दिवसांमध्ये पोटा संबंधित आजार निर्माण होऊ शकतात.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com