मायग्रेनमुळे 'या' आजाराचा होऊ शकतो त्रास

मायग्रेनची समस्या असलेल्या लोकांना हृदय विकार होण्याची शक्यता असते.
Migraine
MigraineDainik Gomantak
Published on
Updated on

मायग्रेन हा खूप मोठा आजार म्हणून उदयास येत आहे. मायग्रेन (Migraine) होण्याची अनेक कारणे आहेत. अनेकांना ही समस्या लहानपणातच होते. आजच्या काळात मुलांपेक्षा मुलींमध्ये अधिक आढळतो. पण तुम्हाला मायग्रेन आणि हृदयविकाराचा (Heart Attack) संबंध माहित आहे का? तुम्हाला जर मायाग्रेनची समस्या असेल तर जाणून घ्या कोणती काळजी घ्यावी.

* मायग्रेन असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका असतो का?

ज्या लोकांना मायग्रेनची (Migraine) समस्या असते त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. मायग्रेन असणाऱ्या लोकांमध्ये अस्वस्थता, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे यासारखी लक्षणे असतात. या लोकांमध्ये मेंदूला रक्त पुरवठा कमी झाल्यास हृदय संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

मायग्रेन असणाऱ्या लोकांनी घ्यावी हृदयची काळजी

मायग्रेन (Migraine) समस्या असणाऱ्या लोकांनी नेहमी हृद्यची काळजी घ्यावी. कारण या समस्येमुळे हृद्याचे आरोग्य (Health) धोक्यात येवू शकते. अशा लोकांमध्ये बीपी कमी होण्याची शक्यता असते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे शरीरात मायग्रेन आणि हृदयविकाराची समस्या निर्माण होउ शकते.

Migraine
Covid-19 शी लढण्यासाठी 'या' खास पदार्थाचा करा समावेश

कोणती काळजी घ्यावी -

* मायग्रेन असणाऱ्या लोकांनी मीठाचे सेवन टाळावे.

* नियमितपणे 30 मिनिटे योगा करणे आवश्यक आहे.

* अशा रुग्णानी वजन नियंत्रित करावे. सकस आहार आणि भरपूर पाणी प्यावे.

* मायग्रेनच्या असणाऱ्या लोकांनी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com