Tips for better sleep:
Tips for better sleep:Dainik Gomantak

Tips for better sleep: चांगल्या झोपेसाठी करा हे बदल; मिळेल अनेक समस्यांपासून सुटका

Tips for better sleep: योग्य आहार आणि व्यायाम केल्यास शांत झोप मिळण्यास मदत होईल.

Tips for better sleep: शांत झोप ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. ती मिळवण्यासाठी जीवशैलीमध्ये सकारात्मक बदल करणे आवश्यक आहे. योग्य आहार आणि व्यायाम केल्यास शांत झोप मिळण्यास मदत होईल. आज आपण जाणून घेऊयात शांत झोप येण्यासाठी आपण काय उपाय करु शकतो.

आपल्या जीवनशैलीत काही आवश्यक बदल केल्यास चांगली झोप मदत मिळण्यास मदत होईल.

चला तर जाणून घेऊयात अशा 10 गोष्टी ज्यात तुम्ही बदल करु शकता.

1. रात्रीचा आहार हलका असावा. त्यात प्रथिने व चोथ्याचा समावेश असावा .

2. पाण्याचे प्रमाण संध्याकाळी पाचनंतर कमी करावे.

3. चहा, कॉफी,मद्य यांसारखी पेये वर्ज्य करावीत.

4. तेलकट, खूप तिकट, चमचमीत पदार्थ संध्याकाळच्या जेवणात टाळावेत.

5. रात्रीचे जेवण झोपेच्या किमान दोन तास आधी घ्यावे.

Tips for better sleep:
Rose Water Benefits: दिवसभर रोज वॉटरचा असा वापर केल्यास चेहरा दिसेल फ्रेश

6. किमान रोज एक तास व्यायाम करावा.

7. कोमट पाण्यात पाय बुडवून,तळपायांना तेल लावून लगेच झोपावे.

8. ध्यान व श्वसनामध्ये झोपून श्वसनावर लक्ष केंद्रीत करावे.

Tips for better sleep:
Vaginal Health Issues: महिलांनी 'Vagina' शी संबंधित 'या' 5 समस्यांकडे दुर्लक्ष करू नये

9. शरीराचे घड्याळ वेळेवर झोपून व उठून नियमित करावे.

10. दुपारच्या वेळी झोप काढण्यापेक्षा दहा मिनिटे वामकुक्षी घ्यावी.

हे काही उपाय तुमच्या झोपेची गुणवत्ता वाढवण्यास मदत करतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com