उन्हाळ्यात रोज वॉटरचा वापर करणे फायदेशी असणार आहे. याचा वापर स्किनकेअर रुटिनमध्ये केला पाहिजे. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे ते तुमच्या स्किनकेअर रुटिनमधील एक उत्तम सवय बनते.
तुमची त्वचा (Skin) फ्रेश राहण्यासाठी सकाळी चेहरा धुल्यानंतर रोज वॉटर वापरून पहा किंवा तुमच्या त्वचेवर होणारी जळजळ कमी करण्यासाठी दिवसा वापर करा. चला तर मग जाणून घेउया दिवसभर रोज वॉटरचा (Rose Water) वापर कसा करावा.
रोज वॉटरचा असा करावा वापरा
फेस टोनर
त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही रोज वॉटर (Rose Water) वापरू शकता. तुमच्या सामान्य क्लींजरने चेहरा स्वच्छ करावा आणि नंतर कापसाच्या बॉलवर रोज वॉटर घ्यावे, चेहरा स्वच्छ करावा. असे केल्याने चेहऱ्यावरील घाण साफ होते.
फेस पॅक
तुम्ही फेस पॅकमध्ये गुलाबपाणी देखील वापरू शकता. यासाठी बेसन, हळद आणि चंदन पावडर एका भांड्यात गुलाबपाणी टाकून मिक्स करा. चेहऱ्यावर 10 मिनिटे ठेवावे. नंतर छंड पाण्याने चेहरा (Face) स्वच्छ करावा.
मेकअप काढण्यासाठी वापर
तुम्ही रोज वॉटरचा वापर मेकअप स्वच्छ करण्यासाठी करु शकता. यासाठी चेहऱ्यावर थोडे रोज वॉटर लावावे आणि नंतर कॉटनने चेहरा स्वच्छ करा. थोडा वेळ राहू द्या. असे केल्याने त्वचा स्वच्छ आणि हायड्रेटेड वाटेल.
मिस्ट
दिवसभर चेहरा फ्रेश राहण्यासाठी रोज वॉटर वापरता येते. यासाठी स्प्रे बॉटलमध्ये रोज वॉटर ठेवा आणि नंतर वेळोवेळी चेहऱ्यावर सहज स्प्रे करत राहा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.