Lemongrass चा स्किन केयर रूटीनमध्ये असा करु शकता वापर
नियमितपणे लेमन ग्रासचा स्किन केअर रुटिनमध्ये वापर केल्यास त्वचेची गुणवत्ता सुधारते हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. इतकेच नाही तर लेमनग्रास ऑइल केसांसाठीही खूप चांगले मानले जाते. लेमनग्रासचे नाव ऐकताच अनेकांच्या मनात प्रश्न येतो की लेमनग्रास म्हणजे काय? चला तर मग जाणून घेऊया फायदे कोणते आहेत आणि कसा वापर करावा.
लेमनग्रास म्हणजे काय
ही वनस्पती गवतासारखी दिसते. हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. याचा वास लिंबासारखा असतो. बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की लेमनग्रास ही लिंबूपासून बनलेली एक प्रजाती आहे. आरोग्याव्यतिरिक्त, त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठीयाचा भरपूर वापर केला जातो
वजन कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त
जर तुमची प्रतिकारशक्ती (Immunity) कमकुवत असेल तर तुम्ही तुमच्या आहारात (Health) लेमनग्रास पाण्याचा समावेश करावा.यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते. लेमनग्रासमध्ये लिंबासारखे गुणधर्म असतात. ते शरीराला डिटॉक्स करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे.तुम्ही रिकाम्या पोटी लेमनग्रास पाणी पिऊ शकता, ते सहजपणे शरीर डिटॉक्सिफाय करते.वजन कमी करण्यासाठी लेमनग्रास चहा (Tea) देखील प्याला जाऊ शकतो.
कसे वापरावे
हिवाळ्यात टोमॅटोचे सूप प्यायल्यास त्यात लेमनग्रासही टाक शकता.
त्यामुळे सूपची पौष्टिकता आणि चव दोन्ही वाढते.
तुम्ही लेमनग्रास चहा पिऊ शकता.
लिंबू ग्रासची 7-8 पाने स्वयंपाकातही घालता येतात, त्यामुळे जेवणाची चवही वाढते.
जर तुम्हाला आईस टी आवडत असेल तर तुम्ही त्यात लेमनग्रास देखील घालू शकता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.