हिंदू धर्मात अनेक पवित्र व्रत वैकल्ये केली जातात प्रदोष व्रत हा त्यापैकीच एक आहे. प्रदोष व्रत भोलेनाथ शिवशंकर आणि देवी पार्वतीला समर्पित आहे. श्रावण महिन्यातील दुसरं आणि शेवटचे प्रदोष व्रत (Last Shrawan Pradosh Vrat 2022) 09 ऑगस्ट रोजी येत आहे. याला भौम प्रदोष व्रत असेही म्हणतात. असे मानले जाते की भौम प्रदोष (Bhaum Pradosh Vrat 2022) दरम्यान भोलेनाथ शिवशंकर आणि हनुमान यांची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि सर्व इच्छा पूर्ण होतात.
प्रदोष व्रताचे प्रकार (Types of Pradosh Vrat)
प्रदोष व्रताचे तीन प्रकार आहेत. सोमवारी (Monday) होणाऱ्या प्रदोष व्रताला सोम प्रदोष, मंगळवारी (Tuesday) प्रदोष व्रताला भौम प्रदोष आणि शनिवारी (Saturday) होणाऱ्या प्रदोष व्रताला शनि प्रदोष म्हणतात. या तिघांपैकी सोम प्रदोष आणि शनि प्रदोष हे अत्यंत शुभ मानले जातात.
प्रदोष व्रतासाठी शुभ मुहूर्त
श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी दिनांक 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 05:45 ते 10 ऑगस्ट रोजी दुपारी 02:15 पर्यंत असेल. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 07:06 ते रात्री 09:14 पर्यंत असेल. (Bhaum Pradosh Vrat 2022 date & time)
प्रदोष व्रताची पूजा पद्धती (pradosh vrat vidhi)
प्रदोष व्रताच्या दिवशी स्नान केल्यानंतर भगवान शंकराला पंचामृताने अभिषेक घालावा. त्यानंतर शंकराला फुले, धूप, दिवा, नैवेद्य अर्पण करावा. या वेळी 'ओम नमः शिवाय' किंवा महामृत्युंजय मंत्र- 'ओम त्र्यंबकम् यजमाहे सुगंधीम् पुष्टीवर्धनम्, उर्वरुकमिव बंधनं मृत्युमुख्य ममृतत्' या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.