Mamata Banerjee Meets PM Modi: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्याच्या वस्तू आणि सेवा कर (GST) च्या थकबाकीसह विविध मुद्द्यांवर चर्चा केली. ममता बॅनर्जी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेऊ शकतात.
तत्पूर्वी, तृणमूल काँग्रेस (TMC) प्रमुख बॅनर्जी यांनी दिल्लीत पक्षाच्या खासदारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संसदेचे चालू अधिवेशन आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केली.
मिळालेल्या माहितीनुसार, बॅनर्जी यांचे पुतणे आणि पक्षाचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांनी बैठकीत चर्चा केली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसांमध्ये खासदारांनी कोणते मुद्दे उपस्थित करावेत हेही त्यांनी सुचवले. दोघांनीही भाजपला (BJP) घाबरु नका, असे स्पष्टपणे आपल्या खासदारांना सांगितले.
नीती आयोगाची बैठक
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री 7 ऑगस्ट रोजी होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी 7 ऑगस्ट रोजी NITI आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील, ज्यामध्ये कृषी, आरोग्य आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.
तसेच, टीएमसी, टीआरएस आणि आप सारख्या बिगर-काँग्रेस विरोधी नेत्यांसोबत ममता शनिवारी चर्चा करणार आहेत. ममता बॅनर्जी दिल्लीत सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचीही भेट घेऊ शकतात. संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनात असे अनेक प्रसंग आले आहेत, जेव्हा काँग्रेस आणि टीएमसीमध्ये फूट पडली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.