Teeth Astrology: दाताची बत्तीशी मजबूत असल्यास तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरता, जाणून घ्या कसे

सामुद्रिक शास्त्रामध्ये व्यक्तीच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाविषयी अतिशय रंजक माहिती देण्यात आली आहे.
Teeth Astrology
Teeth AstrologyDainik Gomantak
Published on
Updated on

हिंदू धर्मात पाकशास्त्र, स्वप्न विज्ञान, हस्तरेषाशास्त्र अशी अनेक शास्त्रे आहेत. यापैकी एक म्हणजे समुद्रशास्त्र. सामुद्रिक शास्त्रामध्ये व्यक्तीच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाविषयी अतिशय रंजक माहिती देण्यात आली आहे. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा व्यक्तीच्या भविष्याशी संबंध असतो याची देखील माहिती सामुद्रिक शास्त्रात दिली आहे. दात देखील व्यक्तीच्या अनेक गोष्टींबद्दल माहिती देतात.

Teeth Astrology
Teeth AstrologyDainik Gomantak

दातांची संख्येवरून देखील एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल आणि त्याच्या भविष्याबद्दल बरीच माहिती मिळते. चला तर मग या विषयावर सविस्तर जाणून घेऊया.

सामुद्रिक शास्त्रात दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक व्यक्तीच्या तोंडातील दातांची संख्या सारखीच नसते. म्हणजेच कोणाच्या तोंडात 28, कोणाच्या तोंडात 30 आणि कोणाच्या तोंडात 32 दात असतात. दातांच्या वेगवेगळ्या संख्येवरून व्यक्तीची वैशिष्ट्ये ओळखली जातात.

Teeth Astrology
National Unity Day Run: गोव्यात रन फॉर युनिटीला उदंड प्रतिसाद

32 दात असणारे

ज्या लोकांच्या तोंडात 32 दात असतात, त्यांचे आयुष्य खूप आरामात जाते. असे लोक आपली गुपिते इतरांपर्यंत पोचवण्यात पटाईत असतात. असे लोक कोणतीही गोष्ट कोणाशी शेअर करू शकत नाहीत, परंतु त्यांना इतरांची गुपिते सहज कळतात.

30 दात असणारे

30 दात असणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली नसते. या लोकांमध्ये अधिकाधिक पैसा जोडण्याची खासियत असते. या लोकांना समाजात खूप मान असतो.

Teeth Astrology
Andheri Byelections: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी 03 नोव्हेंबरला मतदान, सात उमेदवार रिंगणात

29 दात असणारे

29 दात असणारे लोक नेहमी आनंदी असतात. या लोकांवर लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूची कृपा कायम राहते. त्यांना सर्व सुख-सुविधा मिळतात. त्यांच्या आयुष्यातील सर्व कामं न थांबता पूर्ण होतात.

28 दात असणारे

28 दात असणाऱ्यांचे नशीब त्यांना कधीच साथ देत नाही. त्यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो. असे लोक यश मिळाल्यावरही कधी ना कधी तणावातच राहतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com