Andheri Byelections: अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी 03 नोव्हेंबरला मतदान, सात उमेदवार रिंगणात

 Election
ElectionDainik Gomantak

महाराष्ट्रात (Maharashtra) सत्तांतर झाल्यानंतर होत असलेल्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘166 अंधेरी पूर्व’ विधानसभा (Andheri Byelections) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. यासाठी 01 नोव्हेंबर सायंकाळी 06 वाजेपासून जाहीर प्रचारावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत.

 Election
Mharashtra Politics: शिंदे सरकारची मोठी कारवाई! शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 25 नेत्यांची सुरक्षा हटवली

दरम्यान, अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी आपल्यावर अर्ज माघारीसाठी ठाकरे गटाकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मिलिंद कांबळे यांनी ठाकरे गटाविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. कांबळे यांनी अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता आयोग कांबळे यांच्या मागणीची दखल घेऊन अंधेरी पोटनिवडणूक खरंच रद्द करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 Election
Cyber Intelligence Unit: महाराष्ट्रात होणार डेडिकेटेड सायबर इंटिलिजन्स युनिट

ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महानगरपालिका मंजूर करत नसल्याने शिवसेना (ठाकरे गट) न्यायालयात गेली होती. न्यायालयीन लढाई जिंकल्यानंतर ऋतुजा लटके यांचा पोटनिवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, मिलिंद कांबळे यांनी आयोगाकडे तक्रार केल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोग यासंदर्भात काय निर्णय देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी कांबळे यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला अर्ज माघारी घेतला होता. असे असले तरी ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आणि सहा उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com