Right Pocket For Mobile Phone: स्मार्ट फोन चुकीच्या खिशात ठेवलात तर व्हाल नपुंसक; कोणत्या खिशात ठेवायचा वाचा...

रेडिएशनमुळे शरीराला इतरही धोके
Right Pocket For Mobile Phone
Right Pocket For Mobile PhoneDainik Gomantak
Published on
Updated on

Right Pocket For Mobile Phone: स्मार्ट फोन हा मानवी आयुष्याचा आता अविभाज्य भाग बनला आहे. जणू स्मार्ट फोन म्हणजे शरीराचाच एखादा अयवय असावा, इतकी त्याची सवय माणसाला लागून गेली आहे. तथापि, स्मार्टफोन जितका उपयुक्त आहे तितकाच तो घातकही ठरू शकतो.

त्यामुळे स्मार्टफोन बाळगताना तो तुम्ही कुठे ठेवता हे देखील महत्वाचे आहे. कारण तुम्ही जर चुकीच्या खिशात स्मार्ट फोन ठेवलात तर तुम्ही नपुंसकदेखील होऊ शकता.

Right Pocket For Mobile Phone
Tips for better sleep: चांगल्या झोपेसाठी करा हे बदल; मिळेल अनेक समस्यांपासून सुटका

काही लोक पँटच्या खिशात फोन ठेवतात काही जण शर्टच्या खिशात फोन बाळगत असतात. फोनमधून निघणारे रेडिएशन मानवी शरीराच्या अवयवांना हानी पोहोचवू शकतात. शर्टमध्ये ठेवल्यास हृदयाला या रेडिएशनचा त्रास होऊ शकतो. पॅन्टमध्ये ठेवल्यास तेथील अवयवयांना त्रास होऊ शकतो.

असे असेल तर मग फोन ठेवायचा कुठे? कारण स्मार्ट फोन इतका गरजेचा बनला आहे की सतत सोबत बाळगावा लागतो. तर एका माहितीनुसार 100 पैकी 100 पुरुषांना फोन नेमका कुठल्या खिशात ठेवायचा हे माहिती नसते.

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुम्ही फोन तुमच्या खिशात वायरलेस नेटवर्कशी जोडलेला ठेवता, तेव्हा तुम्हाला शरीरात 2 ते 7 पट रेडिएशनचा सामना करावा लागतो. फोन रेडिएशनदेखील कर्करोगाचे एक कारण मानले जाते.

Right Pocket For Mobile Phone
Rose Water Benefits: दिवसभर रोज वॉटरचा असा वापर केल्यास चेहरा दिसेल फ्रेश

हे रेडिएशन तुमच्या डीएनएची रचना बदलू शकते. यामुळे नपुंसकत्वाचा धोका असतो आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही तुमच्या पँटच्या खिशात सेलफोन ठेवलात तर त्याच्या रेडिएशनमुळे तुमच्या नितंबाची हाडे कमकुवत होऊ शकतात.

मग स्मार्टफोन ठेवायचा कुठे? तुमचा फोन पँटच्या खिशात ठेवू नका जिथून तुमचे नाजूक भाग जवळ असतात. तुम्ही फोन पर्समध्ये किंवा बॅगमध्ये ठेवल्यास उत्तम. पण हे करता येत नसेल तर सेलफोनच्या मागील खिशात ठेवा.

पाठीमागच्या खिशात फोन ठेवतानाही फोनची मागील बाजू वर राहिल असे पाहा. जेणेकरून तेथील अवयवांना रेडिएशनचा किमान संपर्क होईल.

(या लिखाणातील माहिती इंटरनेटवरील माहितीवर आधारीत आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com