Winter Diet Plan: वर्षभर तब्येत ठणठणीत हवी असेल, तर थंडीत खा 'या' गोष्टी

हिवाळा म्हणजे ऋतूचक्रातील सर्वात आल्हाददायक काळ असतो, प्रसन्न हवा आणि आरोग्यदायी वातावरणामुळे या काळात आपली शरीरबांधणी अतिशय वेगाने होत असते.
 Winter Diet Plan | Winter Diet Tips | Winter healthy diet plan
Winter Diet Plan | Winter Diet Tips | Winter healthy diet plan Dainik Gomantak

Diet Plan : हिवाळा म्हणजे ऋतूचक्रातील सर्वात आल्हाददायक काळ असतो, प्रसन्न हवा आणि आरोग्यदायी वातावरणामुळे या काळात आपली शरीरबांधणी अतिशय वेगाने होत असते. शरीरातील नवीन पेशींची उत्पत्ती जोरात होते. शरीरातील दुरुस्ती तसेच देखभालीचे काम चांगल्या पद्धतीने होण्यास हिवाळा ऋतू अतिशय चांगला मानला जातो. त्यामुळे येणाऱ्या ऋतूंमध्ये तंदुरुस्त राहायचे असेल तर शरीराचे भरण-पोषण करणाऱ्या अन्नघटकांनी परीपूर्ण पदार्थांना या काळात प्राधान्य द्यायला हवे.

1. बाजरी, मका, सोयाबिन, राजगिरा, शिंगाडा यांचा वापर थंडीच्या दिवसांत आहारात नियमीतपणे करायला हवा. यातून शरीराला उष्णता आणि प्रोटीन्स मिळण्यास मदत होते. 

 2. थंडीच्या काळात बाजारात कंदमुळे जास्त प्रमाणात उपलब्ध असतात. सुरण, रताळी, बटाटा यांतून शरीराला व्हिटॅमिन्स मिळण्यास मदत होते. भाज्यांमध्ये सोयाबिन, पावटा, मसूर, चवळी यातूनही प्रोटीन्स मिळत असल्याने या काळात आवर्जून खायला हवेत. 

3. याशिवाय खजूर, सुके अंजीर, जर्दाळू, काळ्या मनुका, खारीक, बेदाणे या सुकामेव्यामुळे शरीराला व्हिटॅमिन्स आणि खनिजे मिळण्यास मदत होते. बदाम, आक्रोड, काजू, पिस्ता यांतून शरीराला उपयुक्त घटक मिळत असले तरी त्यात अधिक कॅलरीज असल्याने ते प्रमाणात खायला हवे.

4. थंडीच्या दिवसांत हाडांची दुखणी वाढतात, अंगदुखी, सांधेदुखी अशा वेदना वाढतात. शरीराला असणारी खनिजांची गरज भरुन काढणे या काळात आवश्यक असते. अशावेळी अहळीव आणि डिंक खाल्ल्यास त्याचा शरीराला चांगला फायदा होतो. मेथीच्या दाण्यांना मोड आणून ते खाल्ल्यास हाडांचे आणि सांध्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. 

 Winter Diet Plan | Winter Diet Tips | Winter healthy diet plan
Winter Health Tips : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी करा घरच्या घरी 'हे' उपाय

5. या काळात साखरेऐवजी गूळाचा वापर केल्यास उत्तम. गुळाचा शिरा, मध यांचा वापर केल्यास शरीराला उष्णता आणि खनिजे जास्त प्रमाणात मिळतात. 

6. शरीरबांधणीसाठी प्रोटीन्स आवश्यक असतात, त्यामुळे शरीर चांगले ठेवण्यासाठी पांढरे आणि काळे तीळ थंडीच्या दिवसांत आहारात आवर्जून असायला हवेत. शेंगदाणे, जवस, कारळे यांच्या चटण्याही आवर्जून आहारात असायला हव्यात. 

 Winter Diet Plan | Winter Diet Tips | Winter healthy diet plan
Tips For Healthy Heart : निरोगी हृदयासाठी घ्या ‘असा’ आहार

7. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते. तसेच श्वसनमार्गाचा जंतूसंसर्ग कमी होण्यास आवळा अतिशय उपयुक्त ठरतो. त्यामुळे या काळात आवळा आवर्जून खायला हवा. फुफ्फुसांच्या पेशींचे काम चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आवळा चांगला. 

(आयुर्वेदिक चिकित्सा ही व्यक्तिपरत्वे होणारी असते. वरील माहितीमधील औषधे तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावीत)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com