High Blood Pressure: उच्च रक्तदाबाचा शरीराच्या 'या' अवयवांवर होतो गंभीर परिणाम, वेळीच व्हा सावध; जाणून घ्या

Effects Of High Blood Pressure: उच्च किंवा कमी रक्तदाब संपूर्ण शरीरासाठी हानिकारक आहे. रक्तदाबाचा शरीराच्या काही भागांवर खूप वाईट परिणाम होतो. याचे मुख्य कारण जीवनशैली आणि दैनंदिन दिनचर्या आहे.
Effects Of High Blood Pressure
High Blood PressureDainik Gomantak
Published on
Updated on

उच्च किंवा कमी रक्तदाब संपूर्ण शरीरासाठी हानिकारक असतो. रक्तदाबाचा शरीराच्या काही भागांवर खूप वाईट परिणाम होतो. याचे मुख्य कारण जीवनशैली आणि दैनंदिन दिनचर्या आहे. खाण्याच्या सवयींचा रक्तदाबासाठी कारणीभूत आहेत. ताणतणाव, संगणक, मोबाईल, नोकरी आणि अन्नातील आवश्यक पोषक तत्वांचा अभाव अशी उच्च रक्तदाबाची अनेक कारणे आहेत.

उच्च रक्तदाबाचा (High Blood Pressure) सर्वात आधी हृदयावर परिणाम होतो. याशिवाय, मन, मूत्रपिंड आणि डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. जर उच्च रक्तदाबावर वेळीच उपचार केले नाहीत तर मूत्रपिंड निकामी होण्याचा आणि मेंदूतील रक्तस्रावाचा धोका अनेक पटीने वाढतो. उच्च रक्तदाबामुळे दृष्टी देखील कमी होऊ शकते. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब त्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरु करावेत. मात्र जर तुम्ही उच्च रक्तदाबावरील उपचारांना उशीर केला तर त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होऊ लागतात.

Effects Of High Blood Pressure
High Blood Pressure: ब्लड प्रेशरवर नियंत्रण मिळवायचंय? मग 'या' पदार्थांचा आहारात करा समावेश

उच्च रक्तदाबाची लक्षणे

उच्च रक्तदाबाची काही सामान्य लक्षणे आहेत. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. उच्च रक्तदाबाच्या सुरुवातीला डोक्यात जडपणा आणि वेदना होतात. याशिवाय, थोडे चालल्यानंतरही श्वास घेणे कठीण होते. सतत चिंता सतावत राहते. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची ही लक्षणे जाणवली तर ताबडतोब डॉक्टरांशी (Doctors) संपर्क साधून उपचार सुरु करावेत.

Effects Of High Blood Pressure
Home Remedy For High Blood Pressure: 'या' 5 नैसर्गिक गोष्टी हाय ब्लड प्रेशरवर आहेत रामबाण उपाय

उपचारांच्या अभावामुळे होणारे नुकसान

उच्च रक्तदाबाला 'सायलेंट किलर' असेही म्हणतात. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा धोका खूप वाढतो. याशिवाय, मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होतो आणि मूत्रपिंडाला गंभीर हानी पोहोचते. उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंड निकामी देखील होऊ शकते. उच्च रक्तदाब डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांवरही परिणाम करतो, ज्यामुळे दृष्टी कमी होते. यासोबतच, आधी सांगितल्याप्रमाणे मेंदूतील रक्तस्रावाचा धोका देखील वाढतो. त्यामुळे उच्च रक्तदाबाची लक्षणे जाणवल्यास शक्य तितक्या लवकर डॉक्टरांकडून उपचार सुरु करावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com