
High Blood Pressure Diet Foods To Control Hypertension Naturally
देशात गेल्या काही वर्षात हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. हाय ब्लड प्रेशर हा असा आजार आहे, जो शरीरातील नसांवर परिणाम करतो. या आजाराला हायपरटेन्शन असेही म्हणतात.
हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयाला ब्लड पंप करण्यासाठी जास्त काम करावे लागते, ज्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका निर्माण होतो. हाय बीपी MM Hg मध्ये मोजला जातो. सर्वसाधारणपणे, जर तुमचे रिडींग 130/80 मिलीमीटर पारा (मिमी एचजी) किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्हाला हाय बीपी असू शकतो. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी आणि अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, हाय बीपी शरीराच्या अनेक अवयवांना हानी पोहोचवतो.
दरम्यान, हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांना आजार नियंत्रित ठेवण्यासाठी औषधे दिली जातात, परंतु जर त्यांनी त्यांच्या आहाराची योग्य ती काळजी घेतली तर हा आजार नियंत्रित राहू शकतो. चला तर मग याबाबत तज्ञांकडून अधिक जाणून घेऊया...
बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटमधील एंडोक्राइनोलॉजीचे डॉ. साकेत कांत यांनी सांगितले की, हाय बीपीच्या रुग्णांसाठी निरोगी आणि संतुलित डायट प्लॅन आवश्यक असतो. हा हायट प्लॅन हाय बीपी नियंत्रित ठेवतो. अशा परिस्थितीत, जर रुग्णांच्या डाएट प्लॅनबद्दल बोलायचे झाल्यास, दैनंदिन आहारात हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी बाजरी, गव्हाचे पीठ, ज्वारी, मूग याशिवाय पालक, कोबी अशा हिरव्या पाले भाज्यांचे सेवन करावे. सकाळच्या नाश्त्यात त्यांनी ओट्स, फळे खाल्ली पाहिजेत.
हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी दुपारच्या जेवणात भाज्या आणि फळे खावीत. मात्र मांस, दुग्धजन्य पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ, फास्ट फूड आणि जास्त साखर असलेले पदार्थ टाळावेत. याशिवाय, त्यांनी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. तसेच, त्यांनी त्यांच्या डायट प्लॅनचे व्यवस्थितरित्या पालन केले पाहिजे.
हाय ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी आहारासोबत व्यायाम देखील आवश्यक आहे. यासाठी रुग्णांनी योगासने आणि ध्यान केले पाहिजे. तसेच, बीपी नियमितपणे तपासला पाहिजे. आणि महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घेतल्याशिवाय औषधे थांबवली नाही पाहिजेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.