Home Remedy For High Blood Pressure: 'या' 5 नैसर्गिक गोष्टी हाय ब्लड प्रेशरवर आहेत रामबाण उपाय

जर तुमचे ब्लड प्रेशरवर नेहमी हाय असेल तर वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
Hypertension Remedy
Hypertension RemedyDainik Gomantak
Published on
Updated on

Home Remedy For High Blood Pressure: हाय ब्लड प्रेशर अनियंत्रित राहिल्यास हृदयविकार आणि किडनीच्या समस्यांसारख्या गंभीर आजार होऊ शकतात. एवढेच नाही तर अनेक वेळा दाबामुळे शिरा फुटतात.  हाय ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवण्यासठी आहारापासून लाइफस्टाइलमध्ये बदल करणे आवश्यक आहे. 

हाय ब्लड प्रेशर ही अशी स्थिती आहे जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये रक्तदाब वाढतो किंवा जेव्हा तुमचा रक्तदाब 140/90 पेक्षा जास्त असतो तेव्हा या स्थितीला हाय ब्लड प्रेशर म्हणतात.  जेव्हा रक्तदाब 180/120 ची पातळी ओलांडतो, तेव्हा तुमचा धोका अधिक वाढतो. या दाबामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. 

Hypertension Remedy
Homemade Bajra Cake Recipe: स्टेट डिनरमध्ये PM मोदींनी चाखलेला बाजरा केक कसा बनवाल, वाचा रेसिपी
  • लसूण

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन, यूएसए मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, लसूण रक्तवाहिन्या शिथिल करून रक्ताचे सर्कुलेशन सुधारते. यामुळे नैसर्गिकरित्या रक्तदाब कमी होतो. लसणात असलेल्या अॅलिसिनमध्ये उच्च रक्तदाब कमी करणारे प्रभाव असतात. लसणाच्या 4 कळ्या रोज खाल्ल्याने रक्तदाब झपाट्याने कमी होतो.

  • नागफणीच्या पानांचा अर्क

यामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. जे रक्तवाहिन्या विस्तारण्यास, रक्त प्रवाह सुधारण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतात. नागफणीचा अर्क सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दोन्ही रक्तदाब कमी करण्यासाठी प्रभावी आहे.

  • जास्वद

जास्वंद फुलांच्या वाळवलेल्या पाकळ्यांपासून बनवलेल्या चहामुळे उच्च रक्तदाब कमी होतो. हा चहा एंजियोटेन्सिन-कन्व्हर्टिंग एन्झाइम (ACE) प्रतिबंधित करून कार्य करतो. जो रक्तवाहिन्या आराम करण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करतो.

  • दालचिनी 

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. संशोधनात असे दिसून आले आहे की दालचिनी रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारून आणि दाह कमी करून सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकते. 

  • ऑलिव्ह झाडांच्या पानांचा अर्क

ऑलिव्हच्या झाडाच्या पानांमध्ये ऑलियुरोपेन्स नावाचे संयुगे असतात, ज्यात अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. पानांचा अर्क रक्तवाहिन्या शिथिल करून आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करून रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकतो.त्यामुळे उच्च रक्तदाबाचे औषध घेऊनही, या गोष्टी घेऊन तुम्ही तुमचा रक्तदाब नैसर्गिकरित्या कमी करू शकता. 

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com