Homemade Bajra Cake Recipe: स्टेट डिनरमध्ये PM मोदींनी चाखलेला बाजरा केक कसा बनवाल, वाचा रेसिपी

मैदा आणि गव्हाच्या पिठाप्रमाणे तुम्ही बाजरीच्या पिठाचा केकही बनवू शकता. जो बायडनने त्याच्या खास मेजवानीत हा केक सर्व्ह केला होता.
Homemade Bajra Cake Recipe
Homemade Bajra Cake RecipeDainik Gomantak
Published on
Updated on

Homemade Bajra Cake Recipe: पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसीय राजकिय दौऱ्यावर गेले होते. तेथे त्यांनी स्टेट डिनर दरम्यान व्हाईट हाऊसमध्ये बाजरीचा केकचा आस्वाद घेतला होता.  पीएम मोदी स्वतः भरडधान्याचा प्रचार करत आहेत. जेणेकरून लोकांना त्यात दडलेले पोषण समजावे.

या मेजवानीच्या निमित्तानं बाजरीलाही खूप प्रसिद्धी मिळाली. हा केक तुम्ही अगदी सहज घरी बनवू शकता. जरी बाजरीचा केक वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो, परंतु येथे आम्ही तुम्हाला एग्लेस बाजरीच्या केकची रेसिपी सांगणार आहोत.

बाजरा केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

3/4 कप बाजरी

½ कप दूध

250 ग्रॅम खजूर

½ कप ओट्स

बेकिंग पावडर

इसेंस

Homemade Bajra Cake Recipe
Monsoon Skin Care: पावसाळ्यातही सनक्रिन लावणं गरजेचं... कसं ते जाणून घ्या
  • बाजरा केक बनवण्याची पद्धत

सर्वात पहिले ओव्हन प्रीहीट करून ठेवावे.

एका भाड्यात बाजरीचे पीठ, ओट्स आणि बेकिंग पावडर चांगले मिक्स करुन घ्यावे. बेकिंग पावडर घाळून घ्यावे.

खजुराच्या बिया काढून मिक्सरमध्ये बारीक करावे.नंतर ती पेस्ट दूधात मिक्स करावी

आता बाजरी आणि ओट्सच्या पिठात खजूर मिसळलेले दूध मिसळा आणि काट्याच्या मदतीने चांगले मिक्स करावे

केकसाठी परफेक्ट पीठ तयार झाल्यावर त्यात इसेन्स घालून हलकेच मिक्स करा.

जर तुम्हाला जास्त मऊ केक हवा असेल तर तुम्ही थोडे दहीही मिक्स करू शकता.

हे पीठ एका ग्रीस केलेल्या पॅनमध्ये ठेवा आणि ओव्हनमध्ये ठेवा आणि किमान वीस ते तीस मिनिटे शिजू द्या.

केक थंड झाल्यावर पॅनमधून काढून सर्व्ह करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com