Chivali Bhaji
Chivali BhajiDainik Gomantak

Healthy Tips: मधुमेह, हृदयविकारसह अनेक आजारांवर चिवई ठरते रामबाण

या अनोख्या हिरव्या भाजीमुळे अनेक आजार दूर राहू शकतात.
Published on

Chivali Bhaji: हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण यामध्ये चिवईची भाजी अधिक आरोग्यदायी मानली जाते. याच भाजीला चिगळची भाजी आणि बारिक घोळची भाजी देखील म्हणतात. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीफंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात.

काही अभ्यासानुसार, ही भाजी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. एवढेच नाही तर ते यकृत आणि त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. 

  • सांधेदुखीची समस्या दूर

चिवईची भाजी सांधेदुखीची समस्या कमी करू शकते. कारण यामध्ये अनेक पोषक घटक असतात. तसेच सुज आणि होणाऱ्या वेदना देखील कमी होते.

  • रोगप्रतिकारशक्ती वाढते

चिवईच्या भाजीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवण्यास मदत करतात. मुक्त रॅडिकल्स शरीराला हानी पोहोचवू शकतात आणि रोग होऊ शकतात. या भाजीमध्ये असलेले संयुगे शरीरातील टी आणि बी पेशी सक्रिय करतात. टी आणि बी पेशी रोगप्रतिकारक प्रणालीचे महत्त्वाचे घटक आहेत. ते शरीराला संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करतात. 

Chivali Bhaji
फ्रीजमध्ये ठेवलेले 'हे' पदार्थ खाल्यास होऊ शकतो कॅन्सर, आजच बदला सवय
  • मधुमेह नियंत्रणात राहतो

या हिरव्या भाजीचे सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. यामध्ये असलेले संयुगे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतात, ज्यामुळे शरीराला इंसुलिनचा अधिक प्रभावीपणे वापर करण्यास मदत होते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. मधुमेह असणाऱ्या लोकांनी नियमितपणे या भाजीचे सेवन करावे.

  • हृदयाचे आरोग्य चांगले राहते

या हिरव्या भाजीमध्ये फ्लेव्होनॉइड अँटीऑक्सिडंट आढळते. जे हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. फ्लेव्होनॉइड हृदयाच्या स्नायूंना बळकट करण्यास मदत करते. तसेच या भाजीचे नियमितपणे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढते.

  • युरिनमध्ये अडथळे येत नाही

या भाजीचे नियमितपणे सेवन केल्याने युरिन संबंधित आजार दूर राहतात. युरिनरी इन्फेक्शन, मूत्राशयात सूज येणे आणि लघवी करताना जळजळ होणे यासारख्या समस्या दूर राहतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com