फ्रीजमध्ये ठेवलेले 'हे' पदार्थ खाल्यास होऊ शकतो कॅन्सर, आजच बदला सवय

अनेक लोक घाइगडबडीमध्ये पदार्थ फ्रिजमध्ये ठेवतात आणि नंतर गरम करून खातात. असे करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
Healthy Tips
Healthy TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Healthy Tips For Healthy Life: निरोगी आणि फिट राहण्यासाठी ताजे आणि पोषक पदार्थ खाणे गरजेचे असते. पण आजकालच्या धावपळीच्या काळात खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होते. अनेक लोक घाईघाईमध्ये पदार्थ फ्रिजमध्ये ठेवतात आणि नंतर गरम करून खातात.

परंतु असे गरम केलेले पदार्थ खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ पुन्हा गरम केल्याने त्याचे पोषण नष्ट होतेच, पण त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे कर्करोगासारख्या आजारांचा धोकाही वाढू शकतो.

निरोगी राहण्यासाठी हेल्दी लाइफस्टाइल आणि ताजे पदार्थ खाणे महत्वाचे आहे. मात्र, अनेक वेळा आपण छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, ज्या नंतर मोठ्या आजारांचे कारण बनतात. 

फ्रिजमध्ये ठेललेले पदार्थ पुन्हा गरम करून खाणे ही एक वाईट सवय आहे. चला तर मग जाणून फ्रिजमध्ये ठेवलेले कोणते पदार्थ गरम करून खाणे टाळावे.

Rice
Rice Dainik Gomantak
  • भात

अनेक लोकांना बात खायला आवडतो. पण रात्री फ्रिडमध्ये ठेवलेला भात सकाळी गरम करून खाल्यास पोटासंबधित आजार निर्माण होऊ शकतात. यामुळे फ्रिजमध्ये ठेवलेला बात गरम करून खाणे टाळावे.

Eggs
Eggs Dainik Gomantak
  • अंडी

ऑम्लेटपासून ते उकळून भाजी बनवण्यापर्यंत अनेक प्रकारे अंडी खाल्ली जातात. त्यात अनेक पोषक तत्व देखील असतात. अंडी बनवल्यानंतर लगेच खाणे चांगले असते. फ्रीजमध्ये बनवून ठेवलेला पदार्थ गरम करून खाऊ नये अन्यथा ते अनेक आजार उद्भऊ शकतात.

Vegetable
VegetableDainik Gomantak
  • हिरव्या भाज्या

पोषक तत्वांनी समृद्ध हिरव्या भाज्या आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. हिरव्या भाज्यांमध्ये नायट्रेट आढळते. जेव्हा भाज्या वारंवार गरम करता त्यात कॅन्सरचे बॅक्टेरिया पसरतात. ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो.कॅन्सरपासून दूर राहायचे असेल तर असे करणे टाळावे.

Non-Veg
Non-Veg Dainik Gomantak
  • नॉनव्हेज

जर तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलेले नॉनव्हेज पुन्हा गरम करून खात असाल तर ही सवय आजच बंद करा. यामुळे फूड पॉयझनिंगशिवाय तुम्हाला अनेक समस्या उद्भवू शकतात. यामुळे फ्रिडमध्ये ठेवलेले नॉनव्हेज खाणे टाळावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com