Potatoes Health Benefits: बटाटा खाण्याचे अद्भूत फायदे, वाचा एका क्लिकवर

बटाटा खाण्याचे फायदे वाचून तुम्ही व्हाल अचंबित
Potatoes Health Benefits:
Potatoes Health Benefits:Dainik Gomantak
Published on
Updated on

बटाटा ही अशी भाजी आहे, जी प्रत्येकाच्या आवडीची आहे. बटाट्यापासून अनेक प्रकारचे चवदार पदार्थ बनले जातात. जसे की बटाट्याची सुकी भाजी, बटाट्याची रस्सा भाजी, बटाट्याची चटणी, बटाट्याचा पराठा यासारख्ये बनवले जातात. पण बटाटे खाल्याने वजन वाढते म्हणून अनेक लोक खाणे टाळतात. पण तुम्हाला माहितीय का की बटाटा खाण्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. चला तर मग जाणून घेऊया बटाटे खाण्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत.

  • बटाटे खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात

बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. यामुळे जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करताता ते बटाटा खाणे टाळतात. पण बटाटा आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बटाटा खाण्याचे कोणते फायदे आहेत हे आपल्याला माहिती असायवा हवे.

  • वजन नियंत्रित राहते

बटाटे खाल्याने वजन नियंत्रणात राहते. बटाटा भूक नियंत्रित करण्यास मदत करते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की अंडी किंवा इतर पदार्थासह बटाट्याचे सेवन केल्यास वजन नियंत्रात ठेवता येते.

Potatoes Health Benefits:
Immunity Boosting Tea: चहामध्ये मिक्स करा फक्त ही एक गोष्ट, इम्युनिटीसह मिळेल जबरदस्त टेस्ट
Weight loss
Weight lossDainik Gomantak
  • हृदयाचे आरोग्य राहते निरोगी

बटाटे हा फायबरचा चांगला स्रोत आहे. बटाट्याचे सेवन केल्याने ह्रदयाचे आरोग्य चांगले राहते. एका अभ्यासात 2,000 हून अधिक लोकांचा समावेश असलेल्यांनी बटाटे खाल्ले, परंतु त्यांच्या हृदयाने योग्य कार्य केले. तसेच टाइप 2 मधुमेहाचा धोका 24 टक्क्यांनी कमी झाला आहे.

heart care
heart careDainik Gomantak
  • बटाटे आतड्याच्या आरोग्यासाठी उत्तम

बटाट्यामध्ये असलेले स्टार्च देखील आतड्याच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करतात. एका अभ्यासामध्ये असे दिसून आले की जे लोक ४ आठवडे दररोज बटाटे खातात त्यांचे आतडे निरोगी राहते.

healthy tips
healthy tipsDainik Gomantak
  • बटाट्यामध्ये अनेक पोषक घटक असतात

बटाट्यामध्ये पोटॅशियम सारख्या अनेक पोषक घटकांचा समावेश असतो.यामुळे रक्तदाब कमी करण्यास मदत मिळते. उच्चरक्तदाब किंवा प्री-रक्तदाबाचा त्रास असलेल्या प्रौढांनी 16 दिवस बटाट्याचे सेवन केल्यास त्यांचा रक्तदाब नियंत्रणात येऊ शकतो.

potatoes
potatoesDainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com