Immunity Boosting Healthy Tea: हिवाळा असो की उन्हाळा अनेकांना चहा हा हवाच असतो.पण तुम्हाला माहिती आहे का चहामध्ये अनेक गोष्टी टाकल्या जातात, ज्या आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात. चहामध्ये टाकणाऱ्या गोष्टी बदलल्या की चहाची चव देखील बदलते.
तुमच्या हातचा चहा चांगला हवा असेल तर काही बेसिक गोष्टींची काळजी घ्यायला हवी. यासोबतच चहाची चव आणि वास वाढवणारे पदार्थ तुम्ही घालू शकता. चहामध्ये लवंग टाकल्यास त्याची चव अधिक वाढते.
लवंग आरोग्यदायी
लवंगमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सला न्युट्रिलाइज करतात. हे फ्री रॅडिकल्स अनेक रोगांचे कारण आहेत.
लवंगमध्ये युजेनॉल नावाचे अँटीऑक्सिडंट असते. टेस्ट-ट्यूब अभ्यासात असे दिसून आले आहे की ते ऑक्सिडेटिव्ह नुकसान टाळते. जर तुम्ही तुमच्या आहारात (Diet) इतर अँटी-ऑक्सिडंट पदार्थांसोबत लवंग घेतल्यास तुमचे आरोग्य (Health) चांगले राहते.
अतिसेवन करु नये
काही टेस्ट ट्युब अभ्यासात असेही समोर आले आहे की लवंग ट्यूमरच्या वाढीस कमी प्रतिबंध करते. पण लवंग तेलाचा जास्त प्रमाणात सेवन केल्यास लिव्हरला नुकसान होऊ शकते. विशेषतः मुलांमध्ये हा त्रास होउ शकतो.
चहा बनवण्याची पध्दत
लवंग चहा बनवण्यासाठी आधी पाणी उकळून घ्या. त्यात लवंगा टाका. यानंतर त्यात किसलेलं आलं घालावे. आता लवंग पाण्यात चांगली उकळू द्या. आता त्यात चहापत्ती घाला. चहाची पाने टाकून चांगले उकळावे. यानंतर त्यात दूध घालावे. दूध उकळल्यानंतर शेवटची साखर घालावी. तुम्हाला हवे असल्यास लवंगा सोबत वेलची टाकून उकळू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.