Healthy Breakfast Recipe: अनेकदा सकाळी नाश्त्यात काय बनवावे हे समजत नाही. मुले हेल्दी भाज्या खाण्यास कंटाळा करतात. विशेषतः जेव्हा पालक खाण्याची वेळ येते. पालकाची भाजी म्हटली की मुलं त्यापासून दूर पळतात.
पण ही हेल्दी भाजी फायदेशीर आहे. मुलांसह कुटुंबातील सर्व सदस्यांना पालक खायला द्यायचा असेल तर नाश्त्यात पालक उत्तपम बनवा. पालकाचे सर्व गुणधर्मही मिळतील आणि चवीला टेस्टीही लागेल.
ही रेसिपी झटपट तयार होते आणि मेहनत लागत नाही आणि काही मिनिटांत तयार होते. चला तर मग जाणून घेऊया पालक उत्तपम बनवण्याची रेसिपी.
पालक उत्तपम बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- एक वाटी रवा,
- अर्धी वाटी दही,
- पालक 100 ग्रॅम
- एक टीस्पून मोहरी
- अर्धा चमचा जिरे
- दोन हिरव्या मिरच्या
- मीठ चवीनुसार
पालक उत्तपम बनवण्याची कृती
पालक उत्तपम बनवण्यासाठी पहिले पालक पाण्यात उकळून घ्यावे. नंतर हा पालक बारीक करून त्याची पेस्ट तयार करा. एका मोठ्या भांड्यात रवा घ्या आणि त्यात दही घाला. चांगले मिक्स करा आणि सुमारे अर्धा तास बाजूला ठेवा. नंतर त्यात पालक प्युरी घाला आणि आवश्यक असल्यास पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
उत्तपम पेस्ट मध्ये फोडणी घाला
उत्तपमची चव वाढवण्यासाठी त्यात फोडणी घाला. तडक्यासाठी कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाका. तसेच मोहरी आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. कढीपत्ता घाला आणि उत्तपम पेस्टमध्ये तडका घाला.
आता ही पेस्ट उत्तपम बनवण्यासाठी तयार आहे. ते बनवण्यासाठी पॅन गरम करा आणि तेल घाला. तव्यावर तयार केलेले बॅटर घाला आणि त्यावर झाकन ठेवा. सुमारे दोन मिनिटे शिजवा.
ते चांगले शिजल्यावर उलटे करून एक मिनिट शिजवा. दोन्ही बाजूने नीट भाजल्यानंतर ते तव्यावरून काढून प्लेटमध्ये ठेवा आणि हिरवी चटणी किंवा नारळाच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.