Meditation कोणी करावं? जाणून घ्या फायदे

मेडिटेशन केल्याने रागावर नियंत्रण ठेवता येते.
Meditation
Meditation Dainik Gomantak
Published on
Updated on

Mental Health: धावपळीच्या काळात सर्वच लोक तणावामध्ये असतात. तणव दुर करण्यासाठी मेडिटेशन करणे फायदेशीर ठरते. मेडिटेशन ही फोकसशी संबंधित एक क्रिया आहे, जी अनेकदा लोकांना कठीण वाटते.

मेडिटेशन करण्याचे अनेक फायदे आहेत. मेडिटेशन केल्याने आपले शरीर तसेच मन आणि मन शांत राहते. असे केल्याने आपल्या मेंदूमध्ये पूर्ण लक्ष केंद्रित करून काम करण्याची क्षमता विकसित होते.

  • मेडिटेशचे फायदे  कोणते

मेडिटेशनचे एकच नव्हे तर अनेक फायदे आहेत. झोपेची समस्या असेल तर केवळ मेडिटेशन केल्याने दूर होऊ शकतात. मेडिटेशन हा आनंद आणि शांतीचा सर्वोत्तम उपाय आहे. मेडिटेशन केल्याने आपण चिंता आणि तणावापासून मुक्त होतो. नैराश्यातून मुक्ती मिळते.

Meditation
Ravivar Daan: रविवारी 'या' 5 वस्तुंचे दान केल्यास सूर्यदेवाच्या कृपेने करिअरमध्ये होईल प्रगती
  • कोणी करावं मेडिटेशन?

तज्ज्ञांच्या मते मेडिटेशन दोन वर्षांच्या वयापासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण करू शकतात. लहान मुलांनाही मेडिटेशनविषयी शिकवले पाहिजे. लोक सहसा सकाळी मेडिटेशन करतात.

मेडिटेशन करण्यासाठी सकाळ ही सर्वोत्तम वेळ आहे असे त्यांना वाटते. पण सकाळची वेळ कामाने भरलेली असते, त्यामुळे घाईगडबडीत मेडिटेशन करू नका. नेहमी शांततेत मेडिटेशन करा. मेडिटेशन करण्याची कोणतीही निश्चित वेळ नाही.

  • ओम लावा

मेडिटेशन हा खरोखर लक्ष केंद्रित करण्याचा एक मार्ग आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ध्यान करताना ओम हा शब्द वारंवार बोलु शकता. असे केल्याने तुम्ही ध्यानात मग्न होउन जाता.रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही रोज पाच ते दहा मिनिटे ध्यान करू शकता हे लक्षात ठेवा. तुम्ही 5 मिनिटांनी ध्यान सुरू करा. त्यानंतर, आपण वेळ देखील वाढवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com