Hing Milk: दूधात हींग मिक्स करून प्यायल्यास पाइल्ससह 'हे' 4 आजार राहतील दूर

दुधामध्ये हिंग मिक्स करून प्यायल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात. अनेक आजार देखील दूर राहतात.
Hing Milk Benefits
Hing Milk BenefitsDainik Gomantak
Published on
Updated on

Hing Milk: हिंग केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते. इतकंच नाही तर आयुर्वेदात अनेक गंबार आजारांसाठी हिंगाचा वापर केला जातो. हिंगामध्ये अँटी-बँक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-वायरल गुणधर्म आढळतात. हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण दूधात हिंग मिक्स करून आहारात नियमितपणे वापर केल्यास अनेक आजार दूर राहतात.

  • लिव्हरचे निरोगी आरोग्य

दुधात हिंग मिक्स करून प्यायल्याने शरीर आतून आणि बाहेरून सक्रिय होते. एवढेच नाही तर ते प्यायल्याने लिव्हरशी संबंधित सर्व समस्या दूर राहतात. तसेच पोटासंबंधित सर्व समस्याही दूर होतात.

  • पाइल्स

हिंगाचे दूध पिल्‍याने त्‍यामध्‍ये असलेले पोषक घटकांमुळे मूळव्याध सारख्या अत्यंत वेदनादायक आजारांपासून आराम मिळतो. रोज दुधात हिंग मिक्स करून प्यायल्याने पाइल्समुळे होणारी वेदना देखील कमी होते.

Hing Milk Benefits
Neem Flower Benefits: फक्त पानंच नाही तर कडुलिंबाची फुले देखील आहेत आरोग्यासाठी वरदान
  • सारखी उचकी लागत असेल तर

उचकी येणे ही काही मोठी गोष्ट नाही. पण काही लोकांना सारखी उचकी लागते, ती थांबत नाही. त्यांना यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. अशा वेळी दुधात हिंग मिक्स करून प्यायल्याने लवकर आराम मिळतो आणि उचकी थांबते.

  • कानदुखीपासून आराम मिळतो

तुम्हालाही कानात तीव्र वेदना होत असतील तर बकरीच्या दुधात हिंग मिक्स करून औषधासारख्या ड्रॉपरच्या साहाय्याने कानात टाकू शकता. याने कानाचे दुखणे काही वेळातच कमी होईल. तुमची या समस्येपासून सुटका होईल.

  • पचनशक्ती वाढण्यास मदत होते

दूध आणि हिंगामध्ये असलेले पोषक तत्व पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यास मदत करते. दररोज हिंगाचे दूध प्यायल्याने तुम्हाला नेहमी ताजे आणि उत्साही वाटेल. याशिवाय गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता किंवा अपचनाची समस्या असल्यास दुधात हिंग मिक्स करून पिऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com