Neem Flower Benefits: फक्त पानंच नाही तर कडुलिंबाची फुले देखील आहेत आरोग्यासाठी वरदान

कडुलिंबाच्या फुलांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केल्यास आरोग्याला आणि त्वचेला अनेक फायदे होतात.
Neem Flower Benefits
Neem Flower BenefitsDainik Gomantak
Published on
Updated on

Neem Flower Benefits: लोक अनेक गंभीर आजारांमध्ये कडुलिंबाच्या पानांचा वापर करतात. पण, तुम्हाला माहिती आहे का की कडुलिंबाच्या पानांव्यतिरिक्त त्याची फुले देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. 

आयुर्वेदामध्ये कडुलिंबाच्या झाडाचे सर्व भाग जसे की फळं, पानं, साल आणि फुलं यांचा उपयोग विविध आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. कडुलिंबाच्या फुलांचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केल्याने आरोग्य आणि त्वचा या दोघांनाही अनेक फायदे मिळतात.

कडुलिंबाचे फूल अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया कडुलिंबाची फुले आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत आणि कोणत्या समस्या दूर ठेवतात.

  • रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते

आयुर्वेदामध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कडुलिंबाच्या फुलाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. कडुनिंबाच्या फुलामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आढळतात. जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. मधुमेह असलेल्या लोकांनी कडुलिंबाच्या फुलाच्या पावडरचे सेवन करावे.

  • त्वचेच्या समस्या

कडुलिंबाच्या फुलाचा वापर त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. कडुलिंबाच्या फुलांमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात. यामुळे त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करतात आणि कडुलिंबाच्या फुलांचा उपयोग चेहऱ्यावरचे फोड आणि मुरुम कमी करण्यास मदत करते. यासाठी कडुलिंबाची फुले सुकवून त्याची पावडर त्वचेवर लावावी. नंतर पाण्याने स्वच्छ चेहरा धुवावा.

Neem Flower Benefits
Tulsi Vivah 2023: तांदळाचे 'हे' उपाय केल्यास मिळेल सर्व कामात यश
  • पचनसंस्था निरोगी ठेवा 

कडुलिंबाच्या फुलाचा वापर पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी देखील केला जातो. कडुलिंबाच्या फुलांचा वापर केल्याने बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन यासारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करते.

  • मळमळ कमी होते

कडुलिंबाच्या फुलांचा वास घेतल्यास मळमळ होणे कमी होते. तुम्हाला प्रवासात मळमळ होत असेल तर कडुलिंबाची फुल सोबत ठेवावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com