Healthy Tips: चपाती आणि ब्रेडमध्ये ग्लूटेन हा एक घटक असतो. अनेक लोकांना हा घटक आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. ज्या लोकांना सेलियाक आजार आहे किंवा संसर्ग आहे अशा लोकांनी चपाती किंवा ब्रेड खाणे टाळावे.
ग्लूटेनमुळे पचनासंबंधित समस्या वाढू शकतात. जर तुम्ही महिनाभरासाटी हे खाणे बंद केले तर शरीरात कोणते बदल होतात हे जाणून घेऊया.
पोटासंबंधित समस्या
तज्ञांच्या मते ब्रेड आणि चपाती खाणे बंद केल्यास असरीरात अनेक बदल दिसून येतात. जर तुम्हाला पोटा संबंधित समस्या असेल तर त्या कमी होतात.
पोटदुखी, थकवा, डोकेदुखी कमी होते. तसेच त्वचे संबंधित समस्या देखील कमी होतात.
वजन नियंत्रणात
काही लोकांना त्यांच्या आहारातून ब्रेड आणि चपाती खाणे बंद केल्यास वजन कमी होऊ शकते. शरीरातील कॅलरी कमी झाल्यामुळे तसेच पचनक्रिया सुरळित असल्यामुळे वजन कमी होऊ शकते.
एनर्जी
सेलिआक रोग किंवा ग्लूटेन संवेदनशीलता असलेल्या लोकांना त्यांच्या आहारातून ब्रेड किंवा चपाती खाणे बंद केल्यास एनर्जी वाढू शकते आणि चांगला मूड येऊ शकतो.
कारण यामुळे शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत मिळते.
पोषक घटक
कधीकधी चपाती खाणे बंद केल्यास शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासू शकते. कारण अनेक ग्लूटेन-युक्त धान्य आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असतात.
यामुळे पर्यायी पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.