Kitchen Hacks: नॉन-स्टिक भांडी कमी तेलाने स्वयंपाक करण्याच्या उद्देशाने तयार केली जातात. पण या भांड्यांवर एक थर लावला जातो, ज्यामुळे भांड्यांना काहीही चिकटू देत नाही. याशिवाय या भांड्यांचा तळही सामान्य भांड्यांपेक्षा वेगळा असतो.
त्यामुळे ही भांडी अतिशय काळजीपूर्वक सांभाळावी लागतात. अन्यथा ती खराब होतात. त्यामुळे स्टील स्क्रबरसारख्या कठीण वस्तूने ते घासून स्वच्छ करण्याची चूक कधीही करू नये.
तुमची नॉन-स्टिक भांडी जळल्यावरही नाही. स्क्रबरऐवजी तुम्ही पुढे सांगितलेल्या गोष्टींचा वापर करू शकता.
मिठाचे पाणी
जळलेली नॉन-स्टिकची भांडी स्वच्छ करण्यासाठी हा सर्वात स्वस्त आणि उत्तम मार्ग म्हणजे मीठाच्या पाण्याचा वापर करणे. तुम्ही मीठाच्या पाण्याने नॉन स्टिकची भांडी घासु शकता. यासाठी कोमट पाण्यात 4-5 चमचे मीठ मिक्स टाकून पेस्ट तयार करावी.
नंतर 15-20 मिनिटे जळलेल्या भांड्यावर टाकावे. नंतर स्पंजने घासून स्वच्छ पाण्याने धुवावे. जर डाग पूर्णपणे निघाला नाही तर ही असे दोनवेळा करावे.
गरम पाण्यात डिशवॉश मिक्स करावे
नॉन-स्टिकची भांडे आतून जळत असल्यास ते गॅसच्या शेगडीवर ठेवावे. त्यात पाणी आणि डिश वॉश टाकावे. नंतर 5 मिनिटे तसेच राहू द्यावे.
हे भांड्याच्या पृष्ठभागावरुन अन्नाचा जळलेला थर काढून टाकेल. नंतर गॅसवरून भांडे काढून थंड होऊ द्या आणि नंतर स्पंजने घासून स्वच्छ करा.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर
जळलेली नॉन-स्टिक भांडी नवीनसारखी चमकण्यासाठी गरम पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करावा. नंतर थोडावेळ हे मिश्रण उकळावे.
नंतर त्यात थोडे व्हिनेगर टाकून पेस्ट तयार करावी. नंतर जळलेल्या भागावर लावा आणि 5-10 मिनिटे सोडा. नंतर स्पंजने घासून स्वच्छ करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.