Hangover Solution: हँगओव्हर का होतो? तो होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

Hangover Reason And Solution: शरिरिरात मद्य गेल्यानंतर त्याचे एसीटाल्डिहाइड या रासायनात रुपांतर व्हायला लागते. एसीटाल्डिहाइड हे एकप्रकारचे विष आहे.
Hangover Solution: हँगओव्हर का होतो? तो होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
HangoverDainik Gomantak
Published on
Updated on

Hangover Reasons And Solution

सध्या सर्वत्र थर्टी फर्स्टच्या पार्टी आणि नव्या वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. अनेकजण पार्टीचे बेत आखत आहेत. पार्टीत चिकन, मटणासह दारुवर देखील ताव मारला जाणार. जोशा -जोशात एक - दोन पेग जास्त होणार यात शंका नाही. पण, मग दुसऱ्या दिवशी येणाऱ्या हँगओव्हरचं करायंच काय? तो कसा उतरवायचा याचीच माहिती आपण या लेखातून घेणार आहोत.

हँगओव्हर कशामुळे होतो? (What causes a hangover)

वैद्यकीय तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्य घेतल्यानंतर नशा कमी होत जाताना शरिरिरावर होणारा परिणाम आणि यामुळे उद्भवणाऱ्या तात्पुरत्या स्वरुपाच्या समस्या म्हणजे हँगओव्हर होय. शरिरिरात मद्य गेल्यानंतर त्याचे एसीटाल्डिहाइड या रासायनात रुपांतर व्हायला लागते. एसीटाल्डिहाइड हे एकप्रकारचे विष आहे. त्यामुळे शरीर या विषाचे चयापचय करण्यासाठी काम करत असते. यामुळे हृदयाचे ठोके वाढू लागतात आणि हळूहळू मळमळ व्हायला लागते. कधीकधी हँगओव्हरमध्ये घाम येणे, अतिसार, उलट्या, डोकेदुखी यासारखा त्रास होऊ शकतो.

Hangover Solution: हँगओव्हर का होतो? तो होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
ड्रिंक अँड ड्राईव्ह करु नका, हेल्मेट घाला; गोव्यात आलेल्या पर्यटकांसाठी पोलिसांची नियमावली, पालन न केल्यास होणार कारवाई

कोणत्या प्रकारच्या मद्यामुळे अधिक किंवा कमी प्रमाणात हँगओव्हर होऊ शकतो?

अल्कोहोलचे प्रमाण अधिक असलेल्या बर्बन, रम, व्हिस्की आणि रेड वाईनमुळे जास्त प्रमाणात हँँगओव्हर होऊ शकतो, असे तज्ञ सांगतात. विघटन प्रक्रियेत शरिराला जास्त काम करावे लागते. साखरयुक्त कॉकटेल, ज्यूस किंवा सोडा घेतल्यास शरिरातील साखर वाढते आणि हळूहळू कमी होताना थकवा होऊ शकतो. तर, हलक्या स्वरुपाच्या बीअर किंवा व्हाईट वाईनमुळे हँगओव्हरचे प्रमाण कमी असू शकते.

हँगओव्हर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? (Tips To Avoid Hangover)

तज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार

- मध्यम प्रमाणात मद्य प्या

- अल्कोहोलयुक्त पेये पाण्यासोबत प्या

- आणि महत्वाचे म्हणजे उपाशी किंवा रिकाम्या पोटी मद्य घेऊ नका

Hangover Solution: हँगओव्हर का होतो? तो होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?
Calangute FDA Raid: फुड स्टॉलवर मिळाले ई-सिगारेट; कळंगुट - बागा येथे FDA टीमकडून झाडाझडती

हँगओव्हर उतरवण्यासाठी उपाय काय? (Solutions/ Medicines)

हँगओव्हर कमी करण्यासाठी ऍस्पिरिन गोळीचा पर्याय सुचवला जातो पण, तोही १०० टक्के असरदार असेल असे नाही, अशी माहिती पेनसिल्व्हेनियातील सेंट ल्यूक युनिव्हर्सिटी हेल्थ नेटवर्कच्या डॉ. हॉली स्टँकविच यांनी एका मासिकाला दिली आहे. पण, यामुळे काही प्रमाणात वेदना / त्रास कमी होऊ शकतो, असे तज्ञ सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com